मोहन भागवतांच्या 'सर्व धर्म एकचं आहेत' या विधानावर शरद पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:04 PM2021-09-07T13:04:07+5:302021-09-07T15:00:49+5:30
पुण्यात साधना सहकारी बँक लि. पुणे मुख्य कार्यालय प्रशासकीय नूतन वास्तू उदघाटन समारंभ
पुणे : आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो. असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय.
पवार म्हणाले, मोहन भागवत हे सर्व धर्माना एकच समजतात हि माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्वाच म्हणजे हिंदू - मुस्लिम त्यांना एक वाटतात. हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानातही भर पडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
पुण्यात साधना सहकारी बँक लि. पुणे मुख्य कार्यालय प्रशासकीय नूतन वास्तू उदघाटन समारंभ आणि माजी खासदार विठ्ठलराव तुपे पाटील पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
सहकारी बँकांनीच आपल्या खातेदारांना सक्षम करावे असं आवाहनही त्यांनी केलंय. ते म्हणाले, 'सहकार ही सामान्य माणसाची विचारधारा आहे. त्यामुळे असंख्य नागरिक या सहकारी बँकांवर विश्वास ठेवून व्यवहार करत असतात. खातेदारांकडे थकीत रक्कम किती आहे. आर्थिक व्यवहाराची सर्व माहिती खातेदारांपर्यत पोहोचवण्याचे काम या बँकांनी करायला हवे. सहकारी बँकांनी आपल्या खातेदारांना सक्षम करा. असंही त्यांनी सांगितलं आहे.' सहकारी बँकेच्या व्यवहारात सरकारने किती हस्तक्षेप करावा. याबाबत सूत्र ठरवले गेले पाहिजे. याबाबत राज्य सरकार लेवलवर चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले.
VIDEO: एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? शरद पवारांचा हल्लाबोल pic.twitter.com/jkT0FBhrQX
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021
बँकेचे चेअरमन पवारांनी केली तक्रार
बँकेच्या उदघाटनप्रसंगी शरद पवारांनी एक मिश्कीलपणे टिप्पणी केली आहे. ''मी या बँकेचा मी एक सभासद आहे. पण माझं नाव घेतलं नाही. तुमच्या बँकेचा नियम आहे, की सभासदाला एकच अपत्य असेल तर तुम्ही १० हजार देतात, मग माझे पैसे कुठे आहेत...? असं ते विनोदी भूमिकेतुन म्हणाले आहेत.''