आयआरएफसीचे समभाग होणार सोमवारी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:22+5:302021-01-14T04:10:22+5:30

पिंपरी-चिंचवड : भारतीय रेल्वेचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरएफसी) समभाग येत्या सोमवार (दि. १८) ...

Shares of IRFC will open on Monday | आयआरएफसीचे समभाग होणार सोमवारी खुले

आयआरएफसीचे समभाग होणार सोमवारी खुले

googlenewsNext

पिंपरी-चिंचवड : भारतीय रेल्वेचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयआरएफसी) समभाग येत्या सोमवार (दि. १८) ते बुधवार (दि. २०) पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुले होणार आहेत. समभाग ५७५ आणि त्या पटीत खरेदी करता येणार आहेत. आयआरएफसीचे चेअरमन अमिताभ बॅनर्जी यांनी बुधवारी (दि. १३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्याची घोषणा केली.

दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला बळकटी मिळेल. प्रवासी क्षमता वाढविणे, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे, रेल्वे मार्गाची उभारणी करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, सध्या दररोज साडेनऊ किलोमीटरचे मार्ग उभारण्यात येत आहे. त्यात २०२२ पर्यंत १९ किलोमीटर प्रतिदिनपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. केवळ मालवाहतुकीचे जाळे उभारण्यासाठी कॉरिडोअर उभारण्यात येणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्यातही आयआरएफसी गुंतवणूक करणार आहे.

हायस्पीड रेल्वेमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव आयआरएफसीकडे दाखल झाला आहे. मात्र, मेट्रो अथवा बुलेट ट्रेनमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती आयआरएफसीचे चेअरमन बॅनर्जी यांनी दिली.

Web Title: Shares of IRFC will open on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.