शरजिल उस्मानी पोलिसांसमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:04+5:302021-03-13T04:17:04+5:30
पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात शरजिल उस्मानी याने स्वारगेट पोलीस ...
पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात शरजिल उस्मानी याने स्वारगेट पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी हजेरी लावली. दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने उस्मानी याचा जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.
उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार : उस्मानी याने बुधवारी दुपारी स्वारगेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. मात्र, या वेळी पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. अगदी रात्री उशिरापर्यंत मीडियाला त्याचा सुगावा लागू दिला नाही. तसेच, अगोदर तर तो चौकशीला आलाच नसल्याचे सांगितले जात होते.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार २०२१ या परिषदेत हिंदू धर्माविषयी भडकावू भाषण केले होते. त्यावरून भाजपने याच मुद्यावर आंदोलने करून उस्मानीच्या अटकेची मागणी केली होती. भावना भडकावल्याप्रकरणी शरजिलवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. स्वारगेट पोलिसांनी चौकशीसाठी बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स उस्मानी याला पाठविले होते. याविरोधात उस्मानी याने उच्च न्यायालयात धाव घेऊन हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यात उच्च न्यायालयाने त्याच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश देत उस्मानी याला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तो बुधवारी पोलिसांसमोर हजर झाला.