शर्जिल उस्मानीला म्हणायचे होते मनुवादी, बी. जे. कोळसे-पाटील यांनी मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:23+5:302021-02-05T05:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शर्जिल उस्मानी याला ‘मनुवादी’ म्हणायचे होते. त्याऐवजी त्याने ‘हिंदू’ शब्द प्रयोग वापरला. त्यामुळे कोणाच्या ...

Sharjeel Usmani meant Manuvadi, b. J. Kolse-Patil apologized | शर्जिल उस्मानीला म्हणायचे होते मनुवादी, बी. जे. कोळसे-पाटील यांनी मागितली माफी

शर्जिल उस्मानीला म्हणायचे होते मनुवादी, बी. जे. कोळसे-पाटील यांनी मागितली माफी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शर्जिल उस्मानी याला ‘मनुवादी’ म्हणायचे होते. त्याऐवजी त्याने ‘हिंदू’ शब्द प्रयोग वापरला. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी सांगितले.

एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी (दि.३०) रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शर्जिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदूंविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एल्गार परिषदेचे आयोजन निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याबाबत कोळसे-पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद ही मनुवाद, मनीवादाच्या विरोधात संघर्ष करीत आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे राजकारणाचे प्रमुख मुद्दे व्हावेत. धार्मिक, मंदिराबाबतचे मुद्दे यावर राजकारण करू नये, असे म्हणणे आहे. सामान्य माणसाच्या गरजेचे प्रश्न राजकारणात प्रमुख स्थानी यावेत, अशी आमची भूमिका आहे.

शर्जिल उस्मानी या २३ वर्षांच्या तरुणाचे संपूर्ण भाषण ऐकावे. आम्ही आजवर ब्राह्मण्यवादाविरोधात संघर्ष करीत आलो आहे. तमिळनाडूतील ब्राह्मणवादाविरोधातील लढाई उस्मानी याला माहिती नाही. तो शब्दाचा वापर करताना चुकला. त्याला मनुवादी म्हणायचा होता. त्याचे भाषण सुरू असताना आपल्याला हे लक्षात आले नाही. नाही तर तेव्हाच आपण त्या शब्दावर आक्षेप घेतला असता.

गेले चार दिवस आमची बदनामी

सर्वोच्च न्यायालयानेही हिंदू हा धर्म नाही तर आचरणपद्धती असल्याचे म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध पुस्तकांमधून हिंदू धर्माविषयी जे काही म्हटले आहे. त्यावर आपली जाहीर चर्चा करायची तयारी आहे. गेले चार दिवस आमची बदनामी सुरू आहे. उस्मानी यांच्या वक्तव्यावरून कोण भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न कोळसे-पाटील यांनी उपस्थित केला.

Web Title: Sharjeel Usmani meant Manuvadi, b. J. Kolse-Patil apologized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.