ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:34+5:302021-01-04T04:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सध्या गावागावांच्या पारावर जोर-बैठका सुरू आहेत. स्थानिक नेत्यांकडून ग्रामपंचायत बिनविरोध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सध्या गावागावांच्या पारावर जोर-बैठका सुरू आहेत. स्थानिक नेत्यांकडून ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास भरघोस निधी देण्याची आश्वासने दिली जात आहेत, तर उमेदवार देखील बिनविरोध दिल्यास गावातील एखादी विकासकामे करून देण्याचा गावकीला शब्द दिला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार (दि. ४) अखेरची मुदत आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी शर्थीची प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला किती यश येणार, यावर जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार, हे निश्चित होणार आहे.
जिल्ह्यात ४४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तब्बल २१ हजार ७७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांच्या छाननीत जिल्ह्यात तब्बल ४४३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामुळे सध्या २१ हजार ६२३ निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहे. आता ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सर्व स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहे. यात गेल्या काही वर्षांत बिनविरोध निवडणुकीचा नवीन ड्रेन्ट देखील निर्माण होत आहे. जिल्ह्यात काही मोठ्या व प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा. २५ लाख रुपयांची विकासकामे करू, दहा लाख रुपयांच्या योजना गावाला देऊ. अशा घोषणा आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य करत आहेत. यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात किती ग्रामपंचायती व सदस्य बिनविरोध होणार, हे स्पष्ट होणार आहे.
--
जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे बाद झालेले अर्ज
तालुका बाद अर्ज वैध अर्ज
वेल्हा ५ ४२६
भोर १७ १२६४
पुरंदर १६ १६४६
दौंड १४१ २११३
इंदापूर ४६ २२४५
बारामती ६६ २०६५
जुन्नर १९ १६७२
आंबेगाव १६ ७२४
खेड १९ २३०८
शिरूर ४५ २६२२
मावळ ८ १५८५
मुळशी १८ ११३८
हवेली २७ १७९७
एकूण ४४३ २१६२३