शौर्य, रोहन, त्रिशिक यांची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:01+5:302021-02-24T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रवीण झिटे यांच्यातर्फे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवीण झिटे यांच्यातर्फे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १२ व १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलांच्या गटात शौर्य घोडके, रोहन बजाज, त्रिशिक वाकलकर यांनी, तर मुलींच्या गटात काव्या देशमुख, श्रेया पठारे, सृष्टी सूर्यवंशी यांनी विजय मिळवत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु या स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शौर्य घोडके याने सिद्धांत दर्डाचा ६-३ असा, तर रोहन बजाजने प्रज्ञेश शेळकेचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पृथ्वीराज दुधाणे व त्रिशिक वाकलकर यांनी अरहंत कवठेकर व राजवीर इंगवले यांचा ६-१ अशा फरकाने पराभव केला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित देवांशी प्रभुदेसाईने अवंतिका सैनीचा ६-० असा सहज पराभव केला. तिसऱ्या मानांकित निशिता देसाईने आदिश्री जोशीवर ६-१ असा विजय मिळविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
१२ वर्षांखालील मुली : दुसरी फेरी, काव्या देशमुख (१) वि.वि. रित्सा कोंडकर ६-५ (५); श्रेया पठारे वि.वि. वीरा हरपुडे ६-१, रिशीता पाटील (४) वि.वि. स्वनिका रॉय ६-१; सृष्टी सूर्यवंशी (२) वि.वि. श्रीया होनकन ६-०
१२ वर्षांखालील मुले : दुसरी फेरी, शौर्य घोडके (१) वि.वि. सिद्धांत दर्डा ६-३; रोहन बजाज वि.वि. प्रज्ञेश शेळके ६-४, शौर्य बावस्कर वि.वि. आर्यन महाजन ६-२, पृथ्वीराज दुधाणे वि.वि. अरहंत कवठेकर ६-१; त्रिशिक वाकलकर वि.वि.राजवीर इंगवले ६-१
१४ वर्षांखालील मुली : दुसरी फेरी, देवांशी प्रभुदेसाई (१) वि.वि.अवंतिका सैनी ६-०; निशिता देसाई (३) वि.वि. आदिश्री जोशी ६-१; स्नेहा स्वामी (६) वि.वि.समृद्धी इंगवले ६-१; मृणाल शेळके (४) वि.वि. सहाना कमलाकन्नन ६-५ (४)