शौर्य समालाचा मानांकित खेळाडूवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:15+5:302021-03-16T04:11:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे (एमएसएलटीए) आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ...

Shaurya Samala's victory over the rated player | शौर्य समालाचा मानांकित खेळाडूवर विजय

शौर्य समालाचा मानांकित खेळाडूवर विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे (एमएसएलटीए) आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत तेलंगणाच्या बिगरमानांकित शौर्य समाला याने चौथ्या मानांकित छत्तीसगढच्या सम्प्रीत शर्माचा सनसनाटी पराभव केला.

या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या अभिराम निलाखे याने आपलाच राज्य सहकारी नील जोगळेकरचा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या समर्थ सहिता याने आसामच्या वेद कलितावर सहज विजय मिळवला. अर्णव पापरकर याने अंशीत देशपांडेला पराभूत केले. तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएस याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या निव कोठारीचे आव्हान संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली (मुख्य ड्रॉ) फेरी :

मुले : प्रणव रेथीन आरएस, तामिळनाडू (१) वि.वि. निव कोठारी, महाराष्ट्र ९-२,

तेजस आहुजा, हरियाणा (३) वि.वि. अक्षत धूल, हरियाणा ९-१,

समर्थ सहिता, वि.वि. वेद कलिता ९-०,

रयान कुथार्थ, केरळ वि.वि. व्ही धीरज रेड्डी, तेलंगणा ९-१,

अभिराम निलाखे वि.वि. नील जोगळेकर ९-४,

वेंकट बटलंकी, तेलंगणा (६) वि.वि. प्रियांश बर्थवल, उत्तराखंड ९-०,

सेंजम अश्वजीत, मणिपूर (७) वि.वि. रिशीक वाविलापल्ली, तेलंगणा ९-१,

महालिंगम खांदवेल, तामिळनाडू (५) वि.वि. विवान कारंडे ९-१,

शौर्य समाला, तेलंगणा वि.वि. सम्प्रीत शर्मा, छत्तीसगढ, (४) ९-४,

सिद्धांत शर्मा, हरियाणा (८) आकांश सुब्रमणियन, गुजरात ९-३,

अर्णव पापरकर वि. वि. अंशीत देशपांडे, महाराष्ट्र ९-२

Web Title: Shaurya Samala's victory over the rated player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.