‘ती’ने केली दहा दिवसांत शंभर किमीची संकल्प सिद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:26+5:302021-09-26T04:11:26+5:30
पुणे : लोकमत ‘ती’चा गणपतीने यंदा संकल्पसिद्धी ही टॅग लाइन वापरली. त्यातून प्रेरणा घेत नांदेड सिटी येथील पस्तिशीच्या घरातील ...
पुणे : लोकमत ‘ती’चा गणपतीने यंदा संकल्पसिद्धी ही टॅग लाइन वापरली. त्यातून प्रेरणा घेत नांदेड सिटी येथील पस्तिशीच्या घरातील पूजा गोगावे यांनीही दहा दिवस दररोज दहा किमी पळण्याचा संकल्प सोडला आणि तो दहा दिवसातं पूर्णही केला. मात्र, धावण्याचा हा संकल्प वेट लॉससाठी नव्हता, तर धावण्याची स्पोर्ट्स ॲडव्हेंचर एंजॉय करण्यासाठी होता, असे त्यांनी सांगत पस्तिशीतल्या साऱ्या गृहिणींसमोर एक आदर्शच ठेवला.
पतीला ऑफिला जाण्यासाठीची तयारी मुलांचे सकाळीच सुरू होणारे ऑनलाइन क्सासेस यामुळे अनेक महिलांना सकाळच्या वेळेत व्यायामासाठी वेळ मिळणे कठीणच वाटते. मात्र, अशा व्यस्त वेळातूनही पूजा गोगावे यांनी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये रोज दहा दिवस पळायचा संकल्प केला. पहिल्या दोन दिवस उत्साहात त्यांनी दहा किमी सावकाश; पण उत्साहात सहज पार केले. मात्र, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी अंगदुखीचा त्रास व्हायला लागला तरीदेखील गणेशोत्सवानिमित्त सोडलेला संकल्प सिद्धीस न्यायचाच याचा चंग बांधला आणि शारीरिक वेदनांना न जुमानता सहाव्या दिवशी चालत-पळत दहा किमीचे अंतर पार केले. मात्र, सातव्या दिवसापासून पुन्हा शारीरिक त्रास दूर झाला आणि रोजपेक्षा अधिक वेगाने धावणे शक्य व्हायला लागले आणि मग ही रोजची दहा किमीचे धाव अनंत चतुर्थीला पूर्ण झाल्यावरच थांबली.
पूजा यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी मॅरेथॉनध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्यानंतर लॉकडाऊनमध्ये धावणे लांबच; पण चालणेही बंद झाले होते. लॉकडाऊननंतर जेव्हा सामान्य जीवन पूर्ववत सुरू झाले त्यावेळी पुन्हा एकदा धावण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन-तीन दिवस आधी त्यांनी मॉर्निंग वॉकला सुरुवात केली. त्याचवेळी गणेशोत्सवात आपण दहा दिवस धावू शकतो याचा विश्वास त्यांना मॉर्निंग वॉक करताना आला आणि त्यांनी गणेश प्रतिष्ठापनेपासून ते गणेश विसर्जनापर्यंत दहा दिवस दररोज धावण्याचा संकल्प केला व सिद्धीस नेला.
---
कोट -१
दहा दिवस धावणे हे माझ्यासमोर आव्हान नव्हतेच. खरे आव्हान होते ते पहाटे साडेपाच वाजता उठून बाहेर पडणे. तुम्ही पहाटे साडेपाचला उठून बाहेर पडला, तर अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असते आणि तुमचा धावण्याचा संकल्प तडीस जाणारच. त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी पहाटे लवकर उठून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे.
-पूजा गोगावे,
गृहिणी, धावपट्टू