‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:02 AM2018-09-18T03:02:53+5:302018-09-18T03:03:15+5:30

‘ती’चा गणपतीच्या आरतीसाठी सोमवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला, दिव्यांग महिला तसेच तृतीयपंथींनी उपस्थिती लावली.

'She' and 'he' pierced the hole! | ‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद !

‘ती’ आणि ‘तो’ भेदाला छेद !

Next

पुणे : ‘ती’ म्हणजे कृती, संस्कृती आणि निर्मिती. आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या महिलांच्या अधिकारांची मात्र चर्चाच होत नाही. ‘ती’चा गणपती या चळवळीच्या माध्यमातून ‘लोकमत’ने गेल्या सहा वर्षांपासून ‘ती’चे अधिकार अधोरेखित केले आहेत. ‘ती’चा गणपतीच्या आरतीसाठी सोमवारी विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला, दिव्यांग महिला तसेच तृतीयपंथींनी उपस्थिती लावली. या उपक्रमातून ‘लोकमत’ने स्त्री-पुरुष यांच्यातील भेदाला छेद दिला आहे, अशा भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

‘ती’चा गणपती हा ‘लोकमत’चा उपक्रम अत्यंत कौैतुकास्पद आहे. स्त्री केवळ घरातच नव्हे, तर बाहेरच्या जगातही जबाबदारी उत्कृष्टपणे निभावते. त्यामुळे समाजात पुरुषांच्या बरोबरीने तिला मान मिळणे गरजेचे आहे. ‘लोकमत’च्या उपक्रमाला माझ्या खूप-खूप शुभेच्छा!
- नेत्रा शहा,
संचालिका, नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल

‘ती’चा गणपती या उपक्रमाला उपस्थित राहून खूप छान वाटले. स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. गणपती हा तिचाच आहे. ती आणि तो भेद ‘लोकमत’ने या उपक्रमाच्या माध्यमातून संपवला आहे. आम्हीही गेल्या चार वर्षांपासून महिलांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करीत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे.
- शीतल बियानी,
शीतल क्रिएशन्स

स्त्री सबलीकरणाच्या आपण केवळ गप्पा मारतो. मात्र, ‘लोकमत’ने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष आदर्श निर्माण केला आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे, स्वत:ला सिद्ध करत आहे. त्यामुळे तिला सन्मानही मिळायलाच हवा. आमच्या घरी लहानपणापासून मीच आरती, पूजा करते. हीच परंपरा मी सासरीही सुरू ठेवली आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. स्त्रियांनी स्वत:ला कमी लेखू नये. ‘लोकमत’चा ‘ती’चा गणपती हा उपक्रम असाच अविरत सुरू राहावा, हीच इच्छा आहे.
- नूपुर दैैठणकर,
नृत्यांगना

गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व विधींची तयारी महिला करतात. सर्व कामे पार पाडण्यासाठी त्या दिवसरात्र राबतात. उत्सवाच्या निमित्ताने तिच्या अस्तित्वाची दखलही घेतली गेली पाहिजे. ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती या उपक्रमातून योग्य प्रकारे स्त्रियांचा सन्मान केला आहे.
- स्वप्नाली कळमकर, नगरसेविका

‘ती’चा गणपतीच्या आरतीसाठी बोलावल्याबद्दल ‘लोकमत’चे मी मनापासून आभार मानते. पार्वती, आरती, गणपती या सर्वांमध्ये ‘ती’ आहे. तिचे अस्तित्व नाकारून चालणार नाही. आरतीची सर्व तयारी तीच करते; मात्र आरतीचा मान मात्र तिला मिळत नाही. ‘लोकमत’ने या भेदाला छेद दिला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. - स्वप्नाली सायकर

समाज बदलतो आहे, हे आशादायी चित्र आहे. महिला आणि तृतीयपंथी यांच्यासाठी असणाºया योजना गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबवायला हव्यात. उत्सवात सेल्फहेल्फ ग्रुपची मदत घेता येऊ शकते. ‘ती’चा गणपतीसारख्या उपक्रमांमधून समाज आम्हाला लवकरात लवकर स्वीकारेल, अशी आशा करायला हरकत नाही.
- चांदनी गोरे, तृतीयपंथी

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे लोकमान्य टिळकांनी सांगितले. याच धर्तीवर ‘माझा जन्म हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच,’ असे मला ठामपणे सांगायचे आहे. आम्हीही समाजाचा एक घटक आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आम्हाला न्याय मिळाला. आता समाजानेही आम्हाला स्वीकारून समानतेची वागणूक द्यावी.
- सोनाली दळवी, तृतीयपंथी

‘लोकमत’च्या उपक्रमामधून स्त्रीला प्रोत्साहन मिळाले आहे. ती कुठेही कमी नाही, हे या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न कौैतुकास्पद आहे. अंध, अपंग महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कायम संकुचित असतो. हा दृष्टिकोन बदलायला हवा. समाजोपयोगी कामांना ‘लोकमत’ने कायमच पाठबळ दिले आहे. हे कार्य अशाच पद्धतीने सुरू राहू द्या. - रिना पाटील, अद्वैैत परिवार

Web Title: 'She' and 'he' pierced the hole!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.