अर्धा किलो हिरव्या मिरच्या खाऊन तिने पैज जिंकली
By admin | Published: June 27, 2016 06:53 PM2016-06-27T18:53:05+5:302016-06-27T19:04:11+5:30
केवळ ५०१ रुपयांची पैज जिंकण्यासाठी त्या महिलेने अर्धा किलो हिरव्या मिरच्या खाण्याचा अजब प्रकार इंदापूरच्या आठवडा बाजारात रविवारी (दि. २६) दुपारी घडला
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">इंदापूर : केवळ ५०१ रुपयांची पैज जिंकण्यासाठी त्या महिलेने अर्धा किलो हिरव्या मिरच्या खाण्याचा अजब प्रकार इंदापूरच्या आठवडा बाजारात रविवारी (दि. २६) दुपारी घडला. या पैजेमुळे बाजारातील बघ्यांची गर्दीही अवाक झाली होती.
प्रसंग तसा गमतीजमतीतच घडला. बाजारासाठी आलेल्या त्या महिलेला हिरव्या मिरच्या विकत घ्यायच्या होत्या. ती मिरच्या विकणाºया महिलेकडे आली. काळपट झाक असणाºया हिरव्या मिरच्या विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. मिरचीचा भाव विचारला. उत्तर तीस रुपये पावशेर असे आले. तिखट आहेत का, असे विचारल्यावर ‘मायंदाळ्या तिखट आहेत’ असे सांगण्यात आले. त्या वेळी ‘मी यातील अर्धा किलो मिरच्या खाऊन दाखवते, मला काय देणार,’ असे आव्हान मिरच्या विकत घेणाºया महिलेने विक्रीसाठी बसणाºया महिलेला दिले. मिरचीच्या तिखटपणाची प्रतिष्ठाच पणाला लागली. मग विक्रेती महिलाही इरेला पेटली. मिरच्या खाल्यास तर ५०१ रुपये बक्षीस देईन, असे ती म्हणाली. हे सगळे बाजार करणाºया लोकांमध्ये झाले. बघता बघता गर्दी जमली.
आव्हान स्वीकारल्यानंतर मग काय विचारता, दोन्ही हातात पाच पाच मिरच्या धरून त्या महिलेने अर्धा किलो मिरच्या पंधरा-वीस मिनिटांत काकडीसारख्या करंडून खाल्ल्या. हास्कारा नाही हुस्कारा नाही. मिरच्या विकणाºया महिलेचे आश्चर्य तिच्या चेहºयावर मावेनासे झाले. मिरच्या संपल्यानंतर पाच मिनिटांनी ग्लासभर कोरा चहा पिऊन ५०१ रुपयांची रोकड घेऊन ती निघूनही गेली. या साºया प्रकारामुळे बाजारातील बघे अवाक झाले.