... ती बनली दिव्यांग भावाचे पाय, वेड्या बहिणीची वेडी माया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 01:08 AM2019-01-10T01:08:10+5:302019-01-10T01:08:49+5:30

वेड्या बहिणीची वेडी माया : व्हीलचेअरला जोडली सायकल

... she made Divan's brother's feet, the crazy sister's crazy Maya | ... ती बनली दिव्यांग भावाचे पाय, वेड्या बहिणीची वेडी माया

... ती बनली दिव्यांग भावाचे पाय, वेड्या बहिणीची वेडी माया

Next

बारामती : मयूरीच्या भावाला जन्मापासूनच दोन्ही पाय नाहीत, त्यामुळे वडील त्याला शाळेत ने आण करायचे मात्र जसजसे दिवस गेले आणि ही दोन्ही कच्चीबच्ची मोठी झाली तस घर भागविण्यासाठी मयुरीच्या वडीलांना कामात झोकून द्यावे लागले. त्यामुळे मुयरीच्या भावाला शाळेत नेण्याची आणण्याची जबाबदार मुयरीवर पडली.

आपण जसे मित्र-मैत्रिणींबरोबर सायकलवर शाळेला जातो-येतो ती मजा आपल्या भावालाही अनुभवता आली पाहिजे ही तिची मनोमन इच्छा. मात्र ज्याला स्वत:च्या पायावर उभा राहता येत नाही त्याल सायकल चालविणे कसे जमणार हा मोठा प्रश्न मात्र मयुरीने जिद्द सोडली नाही. व्हीलचेअरच्या माध्यमातून घरातल्या घरात फिरता येते तसेच त्याचा विकास केल्यावर बाहेरसुध्दा फिरता येईल ही संकल्पना तिच्या डोक्यात घोळायला लागली आणि रांत्रंदिवस आऊटडोअर व्हीलचेअर तयार करण्यासाठी तिचे संशोधन सुरु झाले आणि अखेर आपल्याच सायकलीच्या पुढच्या बाजूला जोडून चालविता येईल अशी एक व्हीलचेअर निर्माण झाली आणि ही बहिन जणू तिच्या दिव्यांग भावाला शाळेत जाण्यासाठी त्याचे पाय झाली.

एखाद्या चित्रपटातील कथनाक शोभावे अशी कहानी आहे बारामती येथील सदोबाचीवाडी या गावात इयत्ता दहावीत शिकरणाऱ्या मयूरी पोपट यादव या बहिनीची. भावाच्या शिक्षणसाठी मयुरीने केलेला प्रयोग पाहून पाहणाºयांचा ओठांवर आपसूकच वेड्या बहिनीची वेडी ही माया... हे गीत तरळतात.

होळ येथील आनंद विद्यालयात मुयरी सध्या दहावीत शिकते आहे. तर तिचा भाऊ निखिलत्याच शाळेत इयत्ता सहावीत शिकतो आहे. शाळेत जाण्यासाठी दोघेही सदोबाची वाडीतून अर्धा किलोमीटर अंतर पार करावे लागते. भावाला इतक्या लांबचा प्रवास करताना होणाºया वेदना कमी करण्यासाठी मयुरीतील वेड्या बहिणीची माया काही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. याच अस्वस्थेतुन सायकलला जोडल्या जाणाºया व्हील चेअरची संकल्पना जन्माला आली. तिने विविध प्रयोग करण्यास सुरवात केली.
अनेकदा तिला अपयश आले. सायकलच्या पुढच्या भागाला व्हीलचेअर जोडण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी मयुरीने गावातील सायकल दुकानदाराची मदत घेतली. या प्रयोगासाठी विज्ञान विषयाच्या शिक्षिका कांतिका वसेकर यांचे प्रोत्साहन देखील महत्वाचे ठरले. अखेर तिची जिद्द यशस्वी ठरली आहे.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
संशोधकांचे संशोधन समाजाच्या दु:खावर फुंकर घालणारे आणि त्यांच्या अडचणी सोडविणारे असेल तर ते सर्वात मोठे संशोधन मानले जाते आणि मयुरीने केवळ तिच्या दिव्यांग भावासाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक दिव्यांगासाठी जणू शाळेत जायची त्यांची स्वप्न या सायकलला जोडणाºया व्हीलचेअरच्या माध्यमातून वास्तवात आणली आहेत. त्यामुळे भोर तालुक्यातील नसरापुर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मयूरीच्या सायकलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. याबद्दल आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. आतार यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
 

Web Title: ... she made Divan's brother's feet, the crazy sister's crazy Maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे