‘ती’ चे पुणे, सुरक्षित पुणे; बाईक रॅली आज मध्यरात्री, महिला सुरक्षेचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:27 AM2017-08-24T04:27:23+5:302017-08-24T04:27:27+5:30
‘हे रस्ते ‘ती’चे, ही माणसं ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भीती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना त्यांना दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा
पुणे : ‘हे रस्ते ‘ती’चे, ही माणसं ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भीती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना त्यांना दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतून ‘लोकमत’ने नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार केला आहे. यातीलच पुढचे पाऊल म्हणून ‘लोकमत’तर्फे आयोजित महिला मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून नारीशक्तीचा जयघोष केला जाणार आहे. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड भागातील एकूण सहा मार्गांहून रात्री साडेदहा वाजता बाईक रॅलीला प्रारंभ होणार आहे.
यूएनएसजीटीच्या सहकार्याने रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट प्रस्तुत, सिस्काच्या सहयोगाने रॅली काढण्यात येणार आहे़ पुणे पोलीस आणि महावीर जैन छात्रालयाने सहकार्य केले आहे. सूर्यदत्ता इंटरनॅशनल सेल्फ डिफेल्स अॅकॅडमी सह प्रायोजक आहेत़
पीएफटी हॉलिडेज् ट्रॅव्हल पार्टनर, पॅन आॅर्थो हॉस्पिटल हेल्थ पार्टनर, सूर्यदत्ता इंटरनॅशनल सेल्फ डिफेल्स अॅकॅडमी एज्युकेशनल पार्टनर, धीरेंद्र अॅडव्हर्टायजिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत़ ‘लोकमत’च्या वतीने पुण्यातील गणेशोत्सवाच्या परंपरेत पुरोगामी पाऊल टाकत ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे.
‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ मिळाले. रोजच्या जगण्याची लढाई लढताना बळ मिळाले आहे.
महिलांच्या मीडनाईट बाईक रॅलीने ‘सुरक्षित पुणे’चा जयघोष केला जाणार आहे. ‘सुरक्षित पुणे’ हा संदेश फलकांद्वारे देण्यात येईल. आजूबाजूला घडणाºया मन सुन्न करणाºया स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे रस्त्याने जाताना ‘आपण सुरक्षित आहोत का?’ हा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावत आहे. मात्र, पुण्याने संपूर्ण राज्याला महिला सुरक्षेबाबत आदर्श घालून दिला आहे. त्याचा जयघोष या रॅलीद्वारे होणार आहे. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.
यातीलच कृतिशील पाऊल म्हणून ‘सेफ पुणे’ ही संकल्पना ‘लोकमत’ राबवित आहे. पुणे हे नेहमीच महिलांसाठी सुरक्षित राहिले आहे. रात्रीच्या वेळीही महिला पुण्यात दुचाकीवरून फिरू शकतात, हा संदेश राज्यभर आणखी अधोरेखित करण्यासाठी रात्री साडेदहा वाजता ‘सेफ पुणे रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहेत रॅलीचे मार्ग
रॅली क्रमांक १ - अप्पा बळवंत चौक- गुरुजी तालीम मंडळ -शगुन चौक, अलका थिएटर चौक- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक २- येरवडा- गुंजन चौक- जहाँगीर हॉस्पिटल- आरटीओ- संचेती हॉस्पिटल- जंगली महाराज रस्ता- खंडुजीबाबा चौक- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ३ - हडपसर मेगा सेंटर- बिगबझार चौक- गोळीबार मैदान- स्वारगेट- टिळक रोड - खंडुजीबाबा चौक फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ४ - अहिल्यादैवी चौक सातारा रोड- सिटी प्राईड चौक- लक्ष्मीनारायण थिएटर- गणेश कला, क्रीडा मंच- टिळक रोड- फर्ग्युसन कॉलेज रोड- महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ५ - वडगाव पूल-सिंहगड रस्ता- राजाराम पूल- मातोश्री वृद्धाश्रम-ताथवडे उद्यान-करिष्मा सोसायटी रोड-कर्वे रस्ता-एसएनडीटी महाविद्यालय-लॉ कॉलेज रस्ता-महावीर जैन छात्रालय
रॅली क्रमांक ६ - लोकमत पिंपरी कार्यालय- बोपोडी-वाकडेवाडी-संचेती हॉस्पिटल-जंगली महाराज रस्ता-गरवारे पूल-फर्ग्युसन कॉलेज रस्ता- महावीर जैन छात्रालय
हे करा
बाईक रॅलीदरम्यान
हेल्मेटचा वापर करा.
आपल्यासोबत रेनकोट,
स्वेटर बाळगा.
वाहतुकीचे
नियम पाळा
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा
हे करु नका
नागमोडी वळणे घेणे टाळा.
जोरजोराने हॉर्न वाजवू नका.
रॅलीमध्ये ट्रिपल सीट बसून सहभागी होऊ नका.
शिस्तीचा भंग करु नका.