जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 07:32 PM2020-08-20T19:32:46+5:302020-08-20T19:55:54+5:30

सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल..

The 'she' video clip made by a close person went viral after the wedding | जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

जवळच्याच व्यक्तीने केलेली ' ती ' व्हिडिओ क्लिप लग्नानंतर झाली वायरल

Next

लोणी काळभोर : तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्या संबंधाची व्हिडिओ क्लिप वायरल करण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. ४ दिवसांपूर्वी ती व्हिडिओ क्लिप वायरल झाली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

   याप्रकरणी २३ वर्षीय विवाहित पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, सुरेश निवृत्ती धांदे ( रा. साडेसतरा नळी, हडपसर ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापासुन पीडितेचा सुरेश याच्याशी ओळख झाली होती. तो तिच्या घरी अधून मधून येत असल्याने दोघांची जवळीक वाढली. आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

 सुमारे १० महिन्यांपूर्वी  सुरेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून हवेली तालुक्याच्या हद्दीतील एका लॉजवर नेले व लग्न करण्याचे वचन देवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व त्याची व्हिडिओ  क्लिप तयार केली होती. त्यानंतर त्याने तिला ती व्हिडिओ क्लिप वायरल करण्याची धमकी देवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत.
 दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले. सध्या आठ दिवसांपासुन ती तिचे आई वडिलांकडे माहेेेरी आली आहे. गेले चार दिवसापूर्वी पीडित व सुरेश यांचे शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ती कोणी व्हायरल केली या बाबत तिला नक्की सांगता येत नाही परंतु, ही व्हिडिओ क्लिप ही सुरेश धांदे यांनीच व्हायरल केली असावी अशी तिची खात्री असल्यानेे तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: The 'she' video clip made by a close person went viral after the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.