पुण्यातील कॅम्पमध्ये बसस्टॉपचे शेड कोसळले; सहा नागरिक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 15:50 IST2021-08-17T15:50:12+5:302021-08-17T15:50:23+5:30
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली

पुण्यातील कॅम्पमध्ये बसस्टॉपचे शेड कोसळले; सहा नागरिक जखमी
लष्कर : कॅम्प भागातील वेस्ट एन्ड सिनेमाजवळील पीएमटी चा बसथांब्याचे शेड आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक कोसळून सहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बस स्टॉप वर आळंदी, पुणे स्टेशन, पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाण्यासाठी बसेस थांबतात. त्यामुळे या ठिकाणी या दिशेने प्रवास करणारे अनेक नागरिक बसची वाट पाहत थांबलेले असतात. आज दुपारी १.१५ च्या सुमारास अचानक ह्या बस स्टॉपचे शेड कोसळल्याने सहा नागरिक जखमी झाले आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच लष्कर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश अबनवे यांनी घटना स्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.