भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:46 AM2017-08-28T01:46:51+5:302017-08-28T01:47:07+5:30

तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे.

Shed the pond drying in the vicinity of the Bhigavana area, and leave the water in the lake to 'Bappa' | भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

Next

भिगवण : खडकवासला धरण चालू पावसाळ्यात दुस-यांदा १०० टक्के भरले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तलावात पाण्याचा खडखडाट झाला आहे. मात्र,अजूनही तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे. इतर तालुक्यांतील तलाव भरले जात असताना इंदापूर तालुक्यावरच अन्याय का केला जातो आहे, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
गेली पाच वर्षे दुष्काळाने भरडून निघालेल्या शेतकºयाला चालू वर्षी पडलेल्या पावसामुळे चांगल्या पिकाची आशा निर्माण झाली होती, तर या भागातील तलाव ज्या जलाशयाकडे अपेक्षेने पाहत आहेत, तो खडकवासला जलाशय चालू पावसाळ्यात दुसºयावेळी १०० टक्के भरला आहे. परंतु, शासनाच्या अनास्थेमुळे पाऊस सुरू असताना पाणी नदीपात्रात सोडून वाया घालवले गेले. हेच पाणी मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील कोरडे तलाव भरून घेण्यासाठी वापरले असते तर या परिसरातील शेतकºयांचे जीवन सुखावले असते. हे तलाव कोरडे पडले आहेत.
खडकवासला धरणात पाणी असूनही तलाव भरण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत
आले आहेत. चालू आवर्तनाला मदनवाडी तलावात पाणी
सोडले आहे. ते कमी असल्यामुळे
ते असून नसल्यासारखे आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी शेतकºयांची व्यथा समजून घेत नसल्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न उग्र स्वरूप घेणार आहे.

Web Title: Shed the pond drying in the vicinity of the Bhigavana area, and leave the water in the lake to 'Bappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.