भीमाशंकर अभयारण्यात आजपासून होणार शेकरूंची गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:28+5:302021-05-24T04:10:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भीमाशंकर : राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह व भीमाशंकरचे वैभव असलेल्या शेकरूची उद्या सोमवार (दि.२४) पासून ...

Shekars will be counted in Bhimashankar Sanctuary from today | भीमाशंकर अभयारण्यात आजपासून होणार शेकरूंची गणना

भीमाशंकर अभयारण्यात आजपासून होणार शेकरूंची गणना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमाशंकर : राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह व भीमाशंकरचे वैभव असलेल्या शेकरूची उद्या सोमवार (दि.२४) पासून भीमाशंकर जंगलात गणना होणार आहे. कोविडच्या धर्तीवर फक्त वनकर्मचारीच यामध्ये सहभागी होणार आहे. सात दिवसही गणना चालणार आहे. शेकरू गणनेत घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरूंची नोंद घेऊन ही गणना केली जाणार आहे. यातून शेकरूंची निश्चीत आकडेवारी व अधिवासाचे ठिकाण समजणार आहे.

सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेल्या भीमाशंकर ते राजमाची यातील जंगल परिसरात शेकरूंचा अधिवास आहे. भीमाशंकरचे अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक हिला 'भीमाशंकरी' असेही म्हणतात. जैवविविधतेने समृध्द अशा नैसर्गिक वनांचे निदर्शक असल्याने भीमाशंकरमधील शेकरूचे संवर्धन करण्यासाठी १९८५ साली शासनाने येथील जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. तसेच शेकरूच्या संवर्धनासाठी नुकतेच भीमाशंकर अभयारण्याचे पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र जाहीर झाले आहे.

भीमाशंकर अभयारण्यात ही गणना जीपीएस व जीओटॅग मॅपवर नोंदी घेवून केली जाणार आहे. यासाठी वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. पावसाळ्याआधी शेकरू नवीन घरटी बनवतात. त्यामूळे मे व जून महिन्यात शेकरूंची गणनना केली जाते. अभयारण्यात असलेल्या १९ बिटांमध्ये ही गणना होणार आहे.

ज्या झाडावर शेकरूचे घरटे आहे, त्या झाडाखाली उभे राहून जीपीएसमध्ये त्याची नोंद घेतली जाते. या नोंदीमध्ये दिनांक, शेकरूचे घरटे असलेले ठिकाण, घरटे असलेल्या झाडाचे नाव, घरटे नवीन कि जुने याची नोंद, सोडून दिलेले घरटे, पिल्लाचे घरटे, वेळ, घरट्याच्या जवळ शेकरू दिसल्यास त्याचे वर्णन, अक्षांशरेखांश, घरट्याचा आकार, घरट्यांची संख्या अशा प्रकारे नोंदी घेतल्या जातात. शेकरूवर अभ्यास केलेल्या संशोधिका रिनी बोर्जेस यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शेकरू गणनेसाठी केला जाणार आहे.

चौकट

शेकरू गणना ही शास्त्रीय पध्दतीने होणार आहे. यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग जंगलातील पुढील नियोजनासाठी होतो. ही गणना स्वत: वन कर्मचारी करणार आहेत. यामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला सहभागी होता येणार नाही. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कोविडची लक्षणे आहेत, त्यांनाही यामध्ये भाग घेता येणार नाही. तसेच गणनेमध्ये कुठेही प्राणी हाताळले जाणार नाहीत. भीमाशंकर प्रमाणेच महाबळेश्वर, फणसाड व आलापल्ली येथे गणना होणार असल्याचे शेकरू गणना प्रशिक्षक व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसरंक्षक एस. वाय. जगताप यांनी दिली.

चौकट

शेकरूची वरची बाजू करड्या रंगाची तर पोट पांढऱ्या रंगाचे असते. हा प्राणी एकट्याने रहातो. प्रत्येक शेकरू दिसायला वेगवेगळे असते. हा प्राणी स्वत:चा एक प्रादेशिक प्रदेश ठरवून घेणारा, सर्वसाधारणपणे झाडावर रहाणारा, प्रामुख्याने फळे खाणारा, फळे नसतील तर बीज, झाडांची फुले, साल खाणारा प्राणी आहे. शेकरूचे आयुष्य ८ ते ९ वर्षांचे असते. शेकरू वर्षातून एक वेळा एका बछड्याला जन्म देतो. एक मादी दरवर्षी प्रजनन करेल असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाट्याने वाढत नाही. सर्प व गरूड शेकरूची शिकार करतात.

23052021-ॅँङ्म-ि02, 03 - शेकरू

23052021-ॅँङ्म-ि04 - शेकरूचे घरटे

Web Title: Shekars will be counted in Bhimashankar Sanctuary from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.