शेळगावात राज्यमंत्री भरणे यांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:11+5:302021-09-17T04:15:11+5:30
शेळगाव याठिकाणी सकाळी गावठाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी स्वच्छतेचे संदेश व घोषवाक्य तयार करण्यात आले होते, ...
शेळगाव याठिकाणी सकाळी गावठाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी स्वच्छतेचे संदेश व घोषवाक्य तयार करण्यात आले होते, या वेळी स्वच्छताविषयक संदेश देण्यात आला. सामुदायिक श्रमदानात गावातील साफसफाई झाडलोट करून कचरा संकलन करण्यात आला.
या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी हा स्वच्छता महाश्रमदान दिन हा उपक्रम चांगला असून स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून गावांनी पर्यावरण आरोग्यासाठी कायम स्वच्छता जपली पाहिजे, असे आवाहन केले
या वेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, मलिकानाथ कलशेट्टी, उदय देवळानकर,तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय परिट, भजनदास पवार, ॲड. लक्ष्मण शिंगाडे, सरपंच रामदास शिंगाडे, ॲड. अशोक शिंगाडे उपस्थित होते.