मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:48 AM2018-03-09T05:48:33+5:302018-03-09T05:48:33+5:30

जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले.

 The shepherd community obstructs ground menace | मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

मेंढपाळ समाजाने जमीनमोजणी रोखली

Next

जेजुरी - जेजुरी औद्योगिक वसाहत टप्पा क्र. ५ च्या विस्तारीकरणासाठी शासनाने नावळी, कोळविहीरे व मावडी येथील शेतीवर दि. १३ एप्रिल २०११ रोजी आरक्षण टाकले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना धनगर समाजातील शेकडो महिला, पुरुष व तरुणांनी रोखले. ‘आमच्या जमिनी विस्तारीकरणासाठी द्यायच्या नाहीत. आम्ही त्या देणार नाही,’ अशा घोषणा देत त्यांनी अधिकाºयांना मोजणी करण्यास मज्जाव केला. सुमारे ६५१ एकर मेंढपाळ समाजाची शेतजमीन न मोजण्याचा शासकीय अधिकाºयांना निर्णय घ्यावा लागला. या वेळी येत्या १५ दिवसांत मुंबई येथे अथवा याच ठिकाणी अधिकारी व बाधित शेतकºयांची बैठक घेऊन अधिकृत निर्णय घेण्याचे ठरले.
पुरंदर तालुक्यातील नावळी येथील १०६६.४० हेक्टर क्षेत्रावर शासनाने औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी आरक्षण टाकले आहे. समाजबांधवांचा मोठा विरोध आहे. त्यांचा विरोध झुगारून गुरुवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, एक दंगल प्रतिबंधक तुकडी यांच्यासह एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन क्र. २२चे उपजिल्हाधिकारी गाडे, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी तसेच मोजणी कर्मचाºयांसह जमिनीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, मोजणीसाठी अधिकारी मोठ्या बंदोबस्तात येणार असल्याने येथील बाधित शेतकरी तसेच एमआयडीसी विस्तारीकरणाला विरोध करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांचा आक्रमकपणा पाहून अधिकाºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी बाधित शेतकºयांच्या वतीने जयराम थोरवे, धनंजय थोरवे, पुना रामा महानवर, रवा महादू थोरवे, मावडीचे माजी सरपंच चंद्रकांत भामे, प्रकाश भामे, भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र जगताप, युवा मोर्चाचे अविनाश वाईकर, प्रसाद अत्रे यांनी शेतकºयांची बाजू मांडली. बैठकीत, येत्या १५ दिवसांत राज्याचे या विभागाचे सचिव, तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे ठरले.
आज धनंजय पुनाजी महानवर, महेंद्र दादासाहेब थोरवे, सुमीत लालसाहेब महानवर यांनी उपोषण सुरू केले आहे. या वेळी शेतकरी जयराम तोरवे, बाळू तोरवे, रावा तोरवे, पुना महानवर, राजू तोरवे, धनंजय तोरवे, भिका कारंडे, सुनील कारंडे, मुक्ता थोरवे, हौसाबाई थोरवे, कलावती महानवर, शकुंतला दौंड, राधाबाई करंडी आदी उपस्थित होते़

या जमिनीचे भूसंपादन झाल्यास या शेतकºयांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जमिनी बागायती असूनही शासन त्या संपादित का करते, हेच आम्हाला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. ज्यांना जमिनी द्यायच्या आहेत त्यांच्या जरूर घ्या, आम्ही विरोध करणार नाही. शासनाने जबरदस्ती केली तर आम्ही आत्महत्या करू; मात्र जमीन संपादित करू देणार नसल्याचे जयराम थोरवे, पुना रामा महानवर व शेतकºयांनी सांगितले.

Web Title:  The shepherd community obstructs ground menace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे