Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 21:10 IST2023-04-03T21:08:55+5:302023-04-03T21:10:02+5:30
बिबट्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हल्ला करून बाबू रामा ढेकळे या मेंढपाळाला जखमी केले...

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी; आंबेगाव तालुक्यातील घटना
मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे शेतात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाबरोबर झोपलेल्या मेंढपाळावर बिबट्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हल्ला करून बाबू रामा ढेकळे या मेंढपाळाला जखमी केले आहे.
बाबू रामा ढेकळे (रा. ढवळपुरी, जि. अहमदनगर) हे एकलहरे येथील प्रशांत लोंढे यांच्या शेतामध्ये आपल्या शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन झोपलेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ढेकळे यांच्या डोक्याला जखम झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राज यांनी पहाटेच्या सुमारास कळंब वनपाल शशिकांत मडके व वनरक्षक संपत तांदळे यांना पाठवून जखमी ढेकळे यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेऊन आले; मात्र मंचर उपजिल्हा रुग्णालयात रेबीची लस नसल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सकाळीच जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेऊन रेबिज लस देण्यात आली आहे, सध्या ढेकळे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपाल मडके यांनी दिली.