'शेठला फार दिवसांनी मुलगा झाला, साड्या अन् पैसे वाटणार...' १ लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 02:39 PM2022-11-07T14:39:47+5:302022-11-07T14:39:58+5:30

थापांना भुलून एका वयस्कर महिलेला चोरट्यांनी अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगून लुबाडल्याची घटना

Sheth got a son after a long time sarees and money will be distributed 1 lakh jewels were stolen | 'शेठला फार दिवसांनी मुलगा झाला, साड्या अन् पैसे वाटणार...' १ लाखांचे दागिने लंपास

'शेठला फार दिवसांनी मुलगा झाला, साड्या अन् पैसे वाटणार...' १ लाखांचे दागिने लंपास

googlenewsNext

धायरी : शेठला फार दिवसांनी मुलगा झाला आहे, तो साड्या व पैसे वाटणार असल्याच्या थापांना भुलून एका वयस्कर महिलेला चोरट्यांनी अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगून लुबाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वडगाव येथील किर्तीनगरमधील गंगोत्री लेडिज कलेक्शनसमोर ५ नोव्हेबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली. याबाबत एका ८५ वर्षाच्या महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तक्रारदार महिला या पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. माझ्या शेठला फार दिवसांनी लेकरु झाले आहे. ते म्हाताऱ्या बायकांना साड्या व पैसे वाटणार आहे, असे सांगून त्यांना गोल्डन बेकरीसमोर घेऊन गेला. तेथे त्याचा दुसरा साथीदार होता. त्याने लाल रंगाच्या पिशवीत असलेले पैशांचे बंडल दखविले. त्यांना अंगावरील सर्व दागिने काढून त्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. तसे केल्यावर पिशवीत असलेले पैशांचे बंडल मिळतील, असे आमिष दाखविले. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंगावरील १ लाख ८९ हजार ४०० रुपयांचे ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या पिशवीत ठेवले. त्यानंतर त्यांनी हातचलाखी करुन त्यांना बिस्किटांचे पुडे असलेली पिशवी देऊन ते निघून गेले. त्यानंतर त्यांनी पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात दागिने आढळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत तक्रार केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.

Web Title: Sheth got a son after a long time sarees and money will be distributed 1 lakh jewels were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.