शि. प्र. मंडळीमध्ये ‘परिवर्तन’

By admin | Published: April 1, 2016 03:31 AM2016-04-01T03:31:58+5:302016-04-01T03:31:58+5:30

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवारांनी स्पष्ट विजय

Shi Q. 'Change' in church | शि. प्र. मंडळीमध्ये ‘परिवर्तन’

शि. प्र. मंडळीमध्ये ‘परिवर्तन’

Next

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवारांनी स्पष्ट विजय मिळवला आहे. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी शिक्षण प्रेमी पॅनलमधील काही उमेदवारांना अटक तर काहींवर गुन्हे दाखल झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. परिणामी शि.प्र.ची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे दिसून आले. शि.प्र. मंडळीच्या मतदारांनी परिवर्तन पॅनलच्या उमेवारांना कौल देऊन परिवर्तन घडवून आणले.
बहुचर्चित शि.प्र. मंडळीच्या २०१६ ते २०२१ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षण क्षेत्रासह डॉक्टर, वकील तसेच राजकीय व्यक्ती उतरल्या होत्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्राचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. त्यात शि.प्र. मंडळीचे अध्यक्ष अभय दाढे यांना पोलिसांना बोगस मतपत्रिकांस पकडून अटक केल्याने मंडळीच्या मतदारांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदान करून आपला रोष व्यक्त केला. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करून पारदर्शी कारभार करतील अशा उमेदवारांना निवडून दिले. मंडळीच्या निवडणुकीत प्रथमच पोस्टल मतदानाऐवजी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. एकूण मतदारांपैकी बुधवारी ११५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ७१ पोस्टल मतपत्रिकांचा समावेश होता. गुरुवारी सकाळी ९ वाजत मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात प्रथम पोस्टल आणि त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
सुरुवातीपासूनच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ही आघाडी कायम होती. प्रत्येक फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी झालेल्या मतदानाची माहिती देत होते. तिसऱ्या फेरीनंतर परिवर्तन पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे उघड झाल्याने उमेदवारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. त्याचप्रमाणे एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या.

शि. प्र. मंडळीच्या निवडणुकीचा निकाल
उमेदवारांची नावे आणि मिळालेली मते पुढील प्रमाणे : चंद्रकांत अरगडे २७३, सारंग काळे १२४, गिरीश कुमठेकर २८५, प्रकाश कुलकर्णी ५४, विनोद खेडकर १४, खेराजी नानाजी अ‍ॅण्ड कंपनी ७, पुरुषोत्तम घैसास ३०३, उन्मेष जोशी ३१, चंद्रशेखर जोशी ७३, प्रकाश जोशी २५८, विष्णू जोशी १८८, राजाभाऊ ढेपे ७७, रामचंद्र ढेरे ५१, अभय दाढे १७४, दीपक दाते १००, मंदार देसाई १०५, राजेंद्र पटवर्धन २५६, उदय पाटणकर १९५, लता पिसाळ २२६, अप्पा पंडित ९१, सिद्धराज पंडित ६५, सुधीर पंडित २७, माधव पेंडसे २७१, श्रीराम भालेराव ८६, प्रमोद भांबुरकर ३९, आनंद माटे २२७, माधव रानडे ८९, जयंत शाळीग्राम १२७, श्रीकृष्ण साठे १४९, सुरेश साठे २६, आनंद क्षीरसागर २७.

शि.प्र.च्या निवडणुकीत सर्वाधिक मते
घेऊन निवडून आलेली उमेदवार
नावगावमते
श्रीकृष्ण चितळेपुणे ८६७
वसंत देसाई पुणे ७६३
पुरुषोत्तम कुलकर्णी सोलापूर ७५७
केशव वझे पुणे ७५१
राजेश पटवर्धन सोलापूर ७४४
जयंत किराडपुणे ७४२
माधुरी मिसाळ पुणे ७३४
मिहिर प्रभुदेसाई पुणे ७१७
एस.के.जैन पुणे ७१६
सुरेश देवळे मुंबई ६९८
दामोदर भंडारी वडगाव ६८१
सतीश पवार पुणे ६५८

Web Title: Shi Q. 'Change' in church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.