सामान शिफ्ट करण्याची चिंता मिटली ! एसटीने कमी दरात होते वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:33 AM2022-12-05T11:33:14+5:302022-12-05T11:35:52+5:30

खासगीपेक्षा एसटीचे मालवाहतूक दर कमी...

shifting luggage Transport is done at low cost by state transport st bus pune | सामान शिफ्ट करण्याची चिंता मिटली ! एसटीने कमी दरात होते वाहतूक

सामान शिफ्ट करण्याची चिंता मिटली ! एसटीने कमी दरात होते वाहतूक

Next

पिंपरी : कोरोना आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. या बिघडलेल्या आर्थिक स्थितीत एसटीने सुरू केलेली मालवाहतूक एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठा हातभार लावते. विशेष म्हणजे घराचे सामान शिफ्ट करण्यासाठी खासगी वाहनांऐवजी एसटी कमी दरात साहित्य शिफ्ट करून देत आहे. एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगाराला या मालवाहतुकीतून सप्टेंबरमध्ये दोन लाख ११ हजार तर ऑक्टोबरमध्ये एक लाख ८८ हजार ८४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

खासगीपेक्षा एसटीचे मालवाहतूक दर कमी

मालवाहतुकीसाठी खासगी वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्या तुलनेत एसटीची मालवाहतूक ही कमी दरामध्ये होत असते. त्यामुळे सामान शिफ्ट करण्यासाठी एसटीच्या मालवाहतूक सेवेला प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाय खासगी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात एसटीनेच मालवाहतूक करत आहेत.

उद्योगनगरीचा मोठा फायदा

पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी औद्योगिक वसाहत, एमआयडीसी आहे. तळेगाव एमआयडीसी तसेच चाकण एमआयडीसी देखील वल्लभनगर आगाराला जवळ आहे. त्यामुळे येथील अनेक कंपन्यांकडून मालवाहतुकीसाठी एसटीच्या मालवाहतूक विभागाला प्राधान्य दिले जाते. त्याचा फायदा वल्लभनगर आगाराला होतो.

महिना - प्रवास (किमी) - उत्पन्न

सप्टेंबर - तीन हजार ७८७ -  दोन लाख ११ हजार २४७ रुपये

ऑक्टोबर - तीन हजार २७२ - एक लाख ८८ हजार ८४४ रुपये

२० जून २०२० ते मे २०२२ मालवाहतूक

कि.मी. - फेऱ्या - उत्पन्न

९८०३७ - ४९३ - ३६,७५,८३२

एसटीच्या मालवाहतुकीसाठी दर

अंतर दर (प्रत्येक किलोमीटरसाठी)

२०० किलोमीटर ५७ रुपये

२०० किलोमीटरच्या पुढे ५५ रुपये

एसटी म्हणजे सुरक्षेची हमी

एसटीने मालवाहतुकीसाठी प्राधान्य देणाऱ्या कंपनी चालकांनी सांगितले की, एसटी म्हणजे सुरक्षेची हमी. शिवाय खासगी वाहतुकीपेक्षा एसटीचे दर कमी असल्याने आम्ही एसटीने मालवाहतूक करण्यास प्राधान्य देत आहोत.

मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कंपन्यांकडून वल्लभनगर आगाराला मालवाहतुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षित मालवाहतुकीसाठी ग्राहकांनी एसटीच्या मालवाहतूक विभागाशी संपर्क साधावा.

- विकास तुळे, मालवाहतूक प्रमुख, वल्लभनगर आगार

Web Title: shifting luggage Transport is done at low cost by state transport st bus pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.