दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 03:42 PM2021-05-19T15:42:31+5:302021-05-19T15:42:38+5:30

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत

Shikalkari gang involved in robbery arrested, Rs 3 lakh confiscated | दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Next
ठळक मुद्देत्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस, मोक्का कारवाईतील आरोपींची होती सक्रिय टोळी

पुणे: पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत जाणार्‍या शिकलकरी टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

टोळीप्रमुख तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकडी) निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २३, रा. महंमदवाडी), सुनील प्रकाश गायकवाड (वय २३ रा. रामटेकडी) गणेश राजेंद्र शिवाडकर (वय २१ रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार किशोर प्रशांत गायकवाड आणि आकाश गणपत माने पळून गेले आहेत.

मोक्का कारवाई केलेले तिलकसिंग आणि निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे हे त्यांच्या साथीदारांसह उरळी कांचन परिसरातील डाळींब गावानजीक कॅनॉल रोडने येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांना मिळाली. त्यानुसार दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या सूचनेनुसार गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने कॅनॉल रोडवर गाडी बिघडली असल्याचा बहाणा करुन सापळा रचला. मोटारीतून आलेल्या तिलकसिंग व इतरांना मदतीचा बहाणा करुन थांबवले. तेव्हा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्यातील दोघे पळून गेले होते.

या टोळीकडून वाहनचोरीचे ४ व घरफोडीचे ३ असे ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व २ लाख ३० हजार रुपयांच्या ४ कार असा माल जप्त केला आहे. तसेच ताब्यात घेतले त्यावेळी एक कार व एक गावठी पिस्तुल असा एकूण ३ लाख ५० हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला आहे. 
तिलकसिंग गब्बरसिंग टाक याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे ६७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे याच्या विरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. सुनिल ऊर्फ बावड्या प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध  ६ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Shikalkari gang involved in robbery arrested, Rs 3 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.