शिक्रापूर दरोड्याचे गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:05+5:302021-08-19T04:14:05+5:30

सात वर्षांपूर्वी पुणे-नगर रोड, एल अँड टी फाटा येथे फिर्यादी संदीप पांडुरंग तातडे (रा. सादनी, ता. सिल्लोड, जि. ...

Shikrapur robbery accused absconding for 7 years arrested | शिक्रापूर दरोड्याचे गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

शिक्रापूर दरोड्याचे गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

Next

सात वर्षांपूर्वी पुणे-नगर रोड, एल अँड टी फाटा येथे फिर्यादी संदीप पांडुरंग तातडे (रा. सादनी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) हे त्यांच्या ताब्यातील लोखंडी सळईने भरलेला ट्रक घेऊन जात असताना त्यांना स्विप्ट कारमध्ये आलेल्या ७ अज्ञात आरोपींनी अडवून हाताने मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाइल, रोख रक्कम ९०००/- रुपये हिसकावून घेऊन लोखंडी सळईने भरलेला ट्रक चोरून पळवून नेला व ट्रकमधील ८,९६० किलो लोखंडी सळया असा एकूण किं रू.३,८६,५१३/- (तीन लाख ऐंशी हजार पाचशे तेरा) चा माल चोरून रिकामा ट्रक न्हावरा येथे सोडून दिला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपींना अटक करण्यात आलेली होती. धनंजय काळे राहणार चंदनगर, पुणे हा तेव्हापासून फरारी होता.

दरोड्याचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी धनंजय बाळासाहेब काळे (वय २९, रा. आनंद पार्क, चंदननगर, पुणे) हा पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा येथे येणार असल्याची बातमी एका खबऱ्यामार्फत मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी धनंजय काळे यास ताब्यात घेतलेले आहे. पोलीस पकडतील या भीतीने सदर आरोपी चंदननगर परिसरात नाव बदलून राहत होता. आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, शब्बीर पठाण, सचिन घाडगे, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, प्रमोद नवले

यांनी केलेली आहे.

सात वर्षापूर्वी पासून फरार असलेला आरोपीला ताब्यात घेतले (धनंजय गावडे)

180821\172-img-20210818-wa0019.jpg

शिक्रापूर ....फरारी आरोपी

Web Title: Shikrapur robbery accused absconding for 7 years arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.