शिक्रापूर शाळेतील ५0 विद्यार्थी जिल्ह्यात चमकले
By admin | Published: June 29, 2017 03:30 AM2017-06-29T03:30:30+5:302017-06-29T03:30:30+5:30
शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेतील ५0 विद्यार्थी यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेतील ५0 विद्यार्थी यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले असून, यातील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील गुणवत्ता यादीमध्ये चमकले असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी दिली आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले विद्यार्थी व त्यांनी मिळविलेले गुण पुढीलप्रमाणे : स्वरूप कडेकर २८०, अक्षदा खराडे २७६, निखिल सूर्यवंशी २७६, सोहम जरे २७६, सोहम कळमकर २७४, प्रणाली गवारे २७४, अरमान अन्सारी २७२, अपेक्षा पेड २७२, नीरज कळमकर २६६, हर्षदीप दोरगे २६४, वैष्णवी वनवे २६०, श्रेया हजारे २६०, साहिल बोऱ्हाडे २५६, वैष्णवी केंजळे २५६, यश कोलते २५६, निकिता राऊत २५६, वैभवी सोनवणे २५६, किरण येळे २५४, सूरज भुजबळ २५२, प्रतीक्षा धुमाळ २५२, अभिजित टोपले २५२, समृद्धी यादव २५२, अथर्व गायकवाड २५०, ओंकार खरपुडे २४८, वंशिका शिंदे २४८, अनिता तंवर २४८, संकेत सायकर २४४, शंतनू शेवाळे २४२, कोमल कोठावळे २४२, प्रतीक्षा कारले २४०, पार्थ कोठावळे २३६, निकिता मीना २३४, करुणा बच्छाव २३२, कृष्णा गिलबिले २३२, प्रणाली शिंदे २३२, ओम डोके २३०, श्रेया चौधरी २२८, श्रीजीत गिलबिले २२८, पियुष वाडेकर २२८, कल्याणी बांगर २२४, समीक्षा फंड २२४, साईराम काशिद २२४, प्राची मासाळ २२४, स्वरांजली फापाळे २२२, साक्षी संकपाळ २२०, अवंतिका लोखंडे २२०, पौर्णिमा कांबळे २१६, वैभवी केंजळे २१२ अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादित केले आहे.
यापैकी स्वरूपा कडेकर हिने राज्यात पाचवा, तर अक्षदा खराडे, निखिल सूर्यवंशी व सोहम जरे यांनी राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे आणि सोहम कळमकर याने जिल्ह्यात २७ वा, प्रणाली गवारे हिने जिल्ह्यात २९ वा, अपेक्षा पेड हिने जिल्ह्यात ३७ वा तसेच अरमान अन्सारी याने जिल्ह्यात ३९ वा क्रमांक मिळविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष गोसावी, तसेच मंगला दोरगे व प्रदीप धुमाळ यांनी मार्गदर्शन केले आहे. शाळेच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, सरपंच अंजना भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, उद्योजक विक्रमशेठ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गिलबिले अभिनंदन केले.