शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:39 PM2023-04-27T22:39:01+5:302023-04-27T22:40:41+5:30

आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही.

Shinde Vs. Thackeray! Defamation Claim by Sushma Andharen against MLA Sanjay Shirsat for three rupees | शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा

शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :  आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी अ‍ॅड. तौसिफ शेख व अ‍ॅड. क्रांतीलाल सहाणे यांमार्फत मंगळवारी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.

    दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे. आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, अंधारे यांच्या वतीने मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी अ‍ॅड. तौसिफ शेख व अ‍ॅड. क्रांतीलाल सहाणे यांमार्फत मंगळवारी न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला.

त्यानुसार, दिवाणी दाव्यात न्यायालयामार्फत शिरसाट यांना नोटीस काढण्यात येईल. तर, फौजदारी दाव्यात त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होतील अन्यथा त्यांविरोधात समन्स काढण्यात येतील, अशी माहिती अंधारे यांचे वकील अ‍ॅड. शेख व अ‍ॅड. सहाणे यांनी दिली. याखेरीज, अ‍ॅड. दीपक गायकवाड, अ‍ॅड. स्वप्नील गिरमे, अ‍ॅड. महेश गवळी यांनी याप्रकरणात काम पाहिले.

Web Title: Shinde Vs. Thackeray! Defamation Claim by Sushma Andharen against MLA Sanjay Shirsat for three rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.