मध्य पुण्यातील २८ गणेश मंडळांची ‘चकाचक’ मोहीम,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:46+5:302021-09-13T04:09:46+5:30
पुणे : गणेशोत्सव घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये साजरा केला जातो. श्रींची पूजा करताना पत्री व विविध फुले अर्पण ...
पुणे : गणेशोत्सव घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये साजरा केला जातो. श्रींची पूजा करताना पत्री व विविध फुले अर्पण केली जातात. शास्त्रानुसार पूजेतील याच निर्माल्याचे विसर्जन योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या पर्यावरणरक्षण करत हे विसर्जन होताना दिसत नसल्याने मध्य पुण्यातील २८ गणेश मंडळांतर्फे निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.
आधार सोशल फाउंडेशन व गणेशोत्सव मंडळांच्या वतीने आयोजित निर्माल्य संकलन मोहीम-पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात झाले. या वेळी आमदार मुक्ता टिळक, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, स्वरदा बापट, श्रीनाथ भिमाले, आयोजक फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, सविता काळोखे, अनिल काळोखे, प्रसाद जोशी, राहुल हांडे, सचिन शुक्ला, धनंजय भिलारे, पूरण हुडके, राजू आखाडे, राजेश शिंदे, कृष्णा जाधव, अमित धुमाळ आदी उपस्थित होते. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अण्णा थोरात यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही अविरतपणे सुरू आहे. उत्सवात निर्माल्य संकलनासाठी प्रशासकीय व्यवस्था नियोजन करते. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी यामध्ये सहभागी होणे, ही बाब कौतुकास्पद आहे.’