लक्ष्मी रस्त्यावर लखलख चंदेरी दुनिया! हजारो दिव्यांचा लखलखाट, रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:15 PM2023-11-02T20:15:04+5:302023-11-02T20:15:39+5:30

या उपक्रमाचे उद्घाटन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार व पोलीस उपायुक्त - झोन १ संदीपसिंग गिल यांच्या हस्ते होणार आहे....

Shining silver world on Lakshmi street! Flashing thousands of lights, the road is 101 years old this year | लक्ष्मी रस्त्यावर लखलख चंदेरी दुनिया! हजारो दिव्यांचा लखलखाट, रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण

लक्ष्मी रस्त्यावर लखलख चंदेरी दुनिया! हजारो दिव्यांचा लखलखाट, रस्त्याला यंदा १०१ वर्षे पूर्ण

पुणे :पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन व पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे लक्ष्मी रोड नामकरण होऊन १०१ वर्षे पूर्ती झाली आहे. त्यामुळे यंदा लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड व बाजीराव रोड परिसर असा सुमारे ३ किमी रस्त्यावर विद्युत रोषणाई केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार व पोलीस उपायुक्त - झोन १ संदीपसिंग गिल यांच्या हस्ते होणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावर गेल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर लखलखाट झाला आहे. ग्राहकांनाही ते आवडत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन रांका ज्वेलर्स प्रा. लि. लक्ष्मी रोड शोरूम जवळ, उंबऱ्या गणपती चौक येथे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी कळविली आहे. दुचाकीवरून लक्ष्मी रस्त्यावरून जाताना अनेक नागरिकांनी या लखलखाटीचे फोटो, व्हिडिओ काढले आहेत. त्यामुळे हा लक्ष्मी रस्त्यावरील लखलखाट कौतुकाचा विषय ठरला आहे.

Web Title: Shining silver world on Lakshmi street! Flashing thousands of lights, the road is 101 years old this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.