शिरसगाव-कुरुळी रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:29+5:302021-07-16T04:08:29+5:30
शिरसगाव काटा येथील जाफा पोल्ट्री रोडने कुरुळी रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. अनेक शेतकरी दूध व्यवसायिक, कंपनीकडे जाणारे ...
शिरसगाव काटा येथील जाफा पोल्ट्री रोडने कुरुळी रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. अनेक शेतकरी दूध व्यवसायिक, कंपनीकडे जाणारे कामगार या रस्त्याचा वापर करत असतात. त्याचबरोबर पिंगळेवस्ती, जाधववस्ती, केदारीवस्ती, साळुंखेमळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. हे सर्व नागरिक याच रस्त्याने ये-जा करत असतात.
पावसाळा असल्याने शिरसगाव काटा ते जाधववस्ती दरम्यान ठिकठिकाणी पाणी साचले जात आहे. बहुतांश भागात रस्ताच पूर्णपणे चिखलात गेला आहे. या रस्त्याने दुचाकी सोडाच परंतु पायी चालणेदेखील मोठे दिव्य आहे. रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत असल्याने गाड्या या चिखलात गुंतून बसतात. निसरडा रस्ता बनल्याने वाहनचालक देखील घसरून पडत असल्याचा घटना घडत आहे. दुचाकीचालकांना तीन किलोमीटर रस्ता पार करायला मोठी कसरत करावी लागते. पाऊस झाल्यानंतर गाड्या बाहेर काढणे हेच मोठे जिकिरीचे असून रात्री अपरात्री रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असल्यास कसे न्यायचे? रस्त्याअभावी रुग्णाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल ही या नागरिकांनी केला आहे.
शिरसगाव काटा येथील या भागात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता या येथील नागरिकांच्या मागणीची लोकप्रिनिधींकडून दखल घेऊन किमान पक्का रस्ता नाही तर सध्याची गरज पाहता मुरुमीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : १५ रांजणगाव सांडस शिरसगाव काटा
फोटो ओळ : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील शिरसगाव ते कुरुळी रस्ता दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.