गुन्हे शाखा उपायुक्तपदी शिरीष सरदेशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:03 AM2018-08-05T01:03:54+5:302018-08-05T01:03:56+5:30
पुणे पोलीस आयुक्तालयात नूतन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार खांदेपालट झाला आहे.
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात नूतन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार खांदेपालट झाला आहे. नव्याने हजर झालेले शिरीष सरदेशपांडे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर तेजस्वी सातपुते यांच्याकडे वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
व्यंकटेशम यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर, या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़ शहरातील आठ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या पुणे शहराबाहेर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण ११ पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्तांची नावे (कंसात नेमणुकीचे ठिकाण) : अशोक मोराळे (वाहतूक ते विशेष शाखा १), ज्योतीप्रिया सिंह (विशेष शाखा २ ते आर्थिक व सायबर गुन्हे शाखा), शेषराव सूर्यवंशी (मुख्यालय २ ते मुख्यालय १), मंगेश शिंदे (नव्याने हजर - परिमंडळ ३), प्रसाद आक्कानवरू (परिमंडळ ४), प्रकाश गायकवाड (नव्याने हजर, विशेष शाखा २ व प्रशिक्षण), स्मार्तना पाटील (नव्याने हजर ते पिं. चिं. आयुक्तालयाकडे वर्ग), शिरीष सरदेशपांडे (नव्याने हजर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा), सुहास पावसे (नव्याने हजर, परिमंडळ ११), बच्चन सिंग (नव्याने हजर झोन, परिमंडळ २) आणि तेजस्वी सातपुते (नव्याने हजर, वाहतूक शाखा)़
अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि संवाद साधत शनिवारी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी कामकाजाचा प्रारंभ केला. शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ), विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेला भेट दिली. नव्याने नेमणूक झालेल्या पोलीस अधिकाºयांशी संवाद साधला.