पालिकेच्या अर्धवट कामाचा शेखचिल्ली नमुना
By admin | Published: December 22, 2015 01:38 AM2015-12-22T01:38:01+5:302015-12-22T01:38:01+5:30
महापालिकेत कशी अर्धवट कामे केली जातात, त्यासाठी पैसे खर्च केले जातात व नंतर त्या अपुऱ्या कामाचा कसा काहीच उपयोग होत नाही,
पुणे : महापालिकेत कशी अर्धवट कामे केली जातात, त्यासाठी पैसे खर्च केले जातात व नंतर त्या अपुऱ्या कामाचा कसा काहीच उपयोग होत नाही, याचे उदाहरण टँकरना बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेतून पुढे आले आहे .
पुण्याच्या परिघाबाहेर गेल्या अनेक वर्षांत नव्याने असंख्य वसाहती झाल्या. कालांतराने त्यांचा पालिकेच्या हद्दीत समावेशही झाला. त्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे. हे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येते. ते पुरेसे पडत नाही; त्यामुळे अनेक वसाहतींकडून खासगी टँकर मागविण्यात येतात. पालिका स्तरावर व खासगी स्तरावरही अशा पाण्याच्या टँकरचा काळाबाजार फार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्याला आळा घालायचा म्हणून पालिकेने मध्यंतरी प्रत्येक टँकरला जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) यंत्रणा बसविणे सक्तीचे केले.
सजग नागरिक मंचच्या वतीने आयुक्त कुणाल कुमार यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली असून, एकतर जीपीएस यंत्रणा काढून टाकावी किंवा मग या यंत्रणेचा दुसरा भाग पालिकेत त्वरित सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना असल्याची टीका मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)