सर्वाधिक खर्च करुनही झगडावे लागले ‘सुळें ’ ना, कमी खर्चात सर्वाधिक मताधिक्य मिळाले ‘शिरोळें ’ना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:42 AM2019-04-08T11:42:49+5:302019-04-08T11:44:15+5:30
सर्वात कमी मताधिक्यांनी विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकीत खर्च करण्यामध्ये देशात सहाव्या क्रमांकावर होत्या़.
-विवेक भुसे-
पुणे : निवडणुकांचा खर्च वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या खर्चामध्ये मात्र त्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही़. गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३ लाख १५ हजार मतांनी पुण्यातून अनिल शिरोळे विजयी झाले होते़. त्यात त्यांनी सर्वात कमी खर्च केला होता़ .तर सर्वात कमी मताधिक्यांनी विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकीत खर्च करण्यामध्ये देशात सहाव्या क्रमांकावर होत्या़.
निवडणुका झाल्यानंतर पुढील ३० दिवसात उमेदवारांना त्यांनी केलेल्या खर्चाची माहिती निवडणुक आयोगाला द्यावा लागतो़.
उमेदवारांना निवडणुकीत खर्च करण्यासाठी ७० लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे़ त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च प्रत्यक्षात केला जात असल्याचे सांगितले जाते़. मात्र, पुणे जिल्ह्यातील चारही खासदारांनी आपला खर्च त्यावेळी दिला होता़. त्यात सर्वाधिक खर्च बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ६४ लाख २९ हजार ४०९ रुपये खर्च केला होता़. हा देशभरातील ५३७ खासदारांमध्ये सहाव्या क्रमांकाचा खर्च होता़. त्याखालोखाल शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ५४ लाख १५ हजार ८८ रुपये खर्च केला होता़ त्यांचा खर्च करण्यामध्ये देशात ८२ वा क्रमांक लागतो़ तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ४२ लाख ९४ हजार ५२४ रुपये खर्च दाखविला होता़, त्यांचा देशात २४२ वा क्रमांक लागतो़.
पुण्यातील अनिल शिरोळे यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळविला तरी खर्चामध्ये मात्र ते खूप मागे होते़. देशात खर्च करणाऱ्या खासदारांमध्ये ३४२ वा क्रमांक लागतो़. त्यांनी ३६ लाख ३४ हजार १०८ रुपये खर्च केला होता़. अनिल शिरोळे यांच्यासाठी तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती़. मात्र, स्टार प्रचारकाच्या जाहीर सभेसाठी केवळ ७ लाख २ हजार १२५ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे़. त्यांनी कार्यकर्त्यांवर ७ लाख २९ हजार रुपये खर्च दाखविला होता़ तर प्रचार साहित्यासाठी ७ लाख २६ हजार रुपये खर्च केले होते़.
सुप्रिया सुळे यांचा सर्वाधिक १९ लाख २१ हजार रुपये खर्च जाहीर सभांवर झाला तर स्टार प्रचारकांसमवेतचा खर्चही १६ लाख रुपये झाला होता़. श्रीरंग बारणे यांनी जाहीर सभांवर २२ लाख ४३ हजार रुपये तर स्टार प्रचारकांसमवेतचा जाहीर सभांचा खर्च सर्वाधिक २१ लाख ५७ हजार रुपये केला होता़.
एका नेत्यांच्या सभेसाठी गावागावांहून अगदी जीप, बसगाड्या भरुन लोक येतात़. प्रत्यक्षात ते आणले जातात, हे उघड सत्य आहे़. मात्र, कागदोपत्री हा खर्च कोठेच दाखविला जात नाही़. त्याचवेळी आम्ही पारदर्शक कारभार करु अशी आश्वासने दिली जात असतात़.
़़़़़़़़़़
२०१४ च्या निवडणुकीत केलेला खासदारांनी खर्च
सुप्रिया सुळे ६४ लाख २९ हजार ४०९
शिवाजीराव आढळराव ५४ लाख १५ हजार ८८
श्रीरंग बारणे ४२ लाख ७९ हजार १५०
अनिल शिरोळे ३६ लाख ५४ हजार ११