शिरसाई कालव्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:38+5:302021-06-03T04:08:38+5:30

बारामती: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील (म्हेत्रेवस्ती) शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी बुधवारी (दि. २) सकाळी ९ वाजता अतिदाबामुळे अचानक ...

Of Shirsai canal | शिरसाई कालव्याची

शिरसाई कालव्याची

Next

बारामती: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील (म्हेत्रेवस्ती) शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी बुधवारी (दि. २) सकाळी ९ वाजता अतिदाबामुळे अचानक फुटली. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. येथील शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवस या भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी असताना जलवाहिनी फुटली. यातून लाखो लिटर पाणी गळती झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाण्यापासून घरातील सामान वाचविण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरू आहे.

शिरसाई कालवा रेल्वेलाईन येथील जलवाहिनी फुटताना मोठा आवाज झाला. त्यामुळे घबराट पसरल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मुरघासाचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या गोठ्यात पाणी शिरल्याचे चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या आहेत. काही चारचाकी वाहने पाणी शिरल्याने बंद पडल्या आहेत.

या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल येथील स्थानिकांसह शेतकऱ्यांनी केला आहे. तर यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी असल्याचा आरोप येथील शेतकरी, माजी सरपंच अतुल हिवरकर, संजीव बोराटे, माजी सरपंच राजू शेख , बाळू म्हेत्रे, बाबू शिंदे, महादेव म्हेत्रे, तुषारभाऊ शिंदे , भारत हिवरकर यांनी केला आहे.

----------------------------

शिर्सुफळ येथील म्हेत्रेवस्ती वरील शिरसाई कालव्याची जलवाहिनी फुटल्याने शेत आणि घरात पाणी शिरले आहे.

०२०६२०२१ बारामती—०३

०२०६२०२१ बारामती—०४

०२०६२०२१ बारामती—०५

——————————————

Web Title: Of Shirsai canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.