शिरूरला पेट्रोलमध्ये पाणी ? पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:49 AM2017-08-23T04:49:30+5:302017-08-23T04:49:33+5:30
येथील मे. धन्यकुमार गोकुळचंद मुथा पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी या पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले.
शिरूर : येथील मे. धन्यकुमार गोकुळचंद मुथा पेट्रोलपंप येथे पाणीमिश्रित पेट्रोल असल्याच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी या पेट्रोलपंपाच्या पेट्रोलचे सॅम्पल तपासणीसाठी ताब्यात घेतले. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तथ्य आढळल्यास उपजिल्हाधिकारी कारवाई करतील, असे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.
काल (दि. २१) रात्री ५ ते ६ ग्राहकांनी तहसीलदारांकडे पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे तक्रार केली़ तपासणीसाठी घेतलेले सॅम्पल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, तेथून ते फॉरेन्सिक लॅबला तपासले जातील. या लॅबच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सॅम्पलमध्ये पाणी अथवा इतर भेसळ आढळल्यास उपजिल्हाधिकारी कारवाई करतील. ‘वॉटर फायंडिंग टेस्ट’द्वारे पेट्रोलमध्ये पाणी असल्यास पेस्टचा रंग लाल होतो. ही टेस्ट तिथेच केली. चालक धन्यकुमार मुथा म्हणाले, पेट्रोलमध्ये पाणी असते तर पेस्ट लावलेल्या काडीला लाल रंग आला असता. मात्र तसे झाले नाही. आम्ही असा प्रकार कधीही केला नाही. यामुळे सॅम्पल टेस्टच्या अहवालानंतर सत्य बाहेर येईलच.