शिरूरला दोन दिवस पाणी बंद

By admin | Published: April 3, 2015 03:19 AM2015-04-03T03:19:49+5:302015-04-03T03:19:49+5:30

शहराला मिनरल वॉटर इतका स्वच्छ पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या अद्ययावत कामासाठी ४ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे

Shirur got water off for two days | शिरूरला दोन दिवस पाणी बंद

शिरूरला दोन दिवस पाणी बंद

Next

शिरूर : शहराला मिनरल वॉटर इतका स्वच्छ पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या अद्ययावत कामासाठी ४ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आठ पाण्याच्या टँकरची व्यवस्था केल्याचे पाणीपुरवठा समितीचे सभापती दादाभाऊ वाखारे यांनी सांगितले. दरम्यान, आज मनसेतर्फे शहरात काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने जलशुद्धीकरण नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी ५ मार्चपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, सलग तीन दिवसांचे काम असल्याने नगर परिषदेने तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगर परिषदेने स्वत:चे व काही खासगी टँकरची व्यवस्था केल्याचे वाखारे यांनी सांगितले.
मनसेने सामाजिक जाणिवेतून आज सय्यदबाबा नगर, कुंभारआळी, लाटेआळी, अंडेबाजार, फकीर मोहल्ला व मातंगवस्ती येथे टँकरने पाणीवाटप केले. मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनविसेचे अध्यक्ष सुशांत कुटे आदी उपस्थित होते.

Web Title: Shirur got water off for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.