शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

By admin | Published: January 7, 2016 01:40 AM2016-01-07T01:40:08+5:302016-01-07T01:40:08+5:30

जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र

Shirur, Mulshi read the water! | शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

Next

पुणे : जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने बुधवारी दिला. त्यामुळे शिरूर व मुळशी तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. येथील जनता प्राधिकरणाच्या निर्णयाची वाट पाहत होती. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निणर्य प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार होती व मुळशीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार होता.
यापूर्वी चासकमान धरणातून ८९.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ८९ दलघमी पाणी सोडले, तर चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३० ते ३५ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यावर येथील सिंचनासाठीचे १ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे.
त्यात धरणातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू होते. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश होता. यामुळे धरणातील पाणीपातळी खालावली होती. जर पूर्वीचा आदेश कायम ठेवला असता, तर पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळाले नसते. पिकं जळून गेली असती. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास विरोध करीत होते. शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून होते. आज नव्याने निर्णय आला असून, यात धरणातून २०.७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी ते ८९.१२ दलघमी होते. म्हणजे ६८.४२ म्हणजे २.३० टीएमसी पाणी वाचले आहे. तसेच कुकडी प्रकल्पातून घोड धरणात सुमारे ३४ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशही मंगळवारी प्राधिकरणानी दिले आहेत. याचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shirur, Mulshi read the water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.