शिरूर तालुका भाजपाच्या वतीने विद्युत वितरण कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:42+5:302021-02-06T04:18:42+5:30
तालुका भाजपाच्या वतीने येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकत महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ...
तालुका भाजपाच्या वतीने येथील
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकत महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, सरचिटणीस वासुदेव काळे, जिल्हा सरचिटणीस धमेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, भगवानराव शेळके, अशोक शेळके, राजू शेख, मितेश गादिया, उमेश शेळके, विजय नरके, महिला आघाडीचे रेश्मा क्षीरसागर, परवीन शेख यांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे
उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने व सहायक अभियंता भगवान विधाटे यांना राज्य सरकारने राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली . त्याबाबत निवेदन दिले . कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने रोजगार उपलब्ध नसताना जनतेला वाढीव वीजबिल देऊन जनतेवर अन्याय केला असून थकीत वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला असून वाढीव वीजबिले माफ केली नाही तर भाजपाच्या वतीने
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष
दादा पाटील फराटे यांनी दिला आहे. या वेळी
उपस्थित कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधी घोषणा देऊन निषेध केला.