शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:36 AM2018-09-28T00:36:07+5:302018-09-28T00:36:21+5:30

शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.

In the Shirur taluka, four gram panchayats have change power | शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

googlenewsNext

शिरूर - तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.
तालुक्यातील रांजणगावसह करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोक सांगवी तसेच कळवंतवाडी या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतमोजणी झाली. यात रांजणगाव, करडे, आंबळे व कळवंतवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला. यामध्ये रांजणगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.
पाचुंदकर यांच्या पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार दत्तात्रय पाचुंदकर यांचा विरोधी पॅनलचे उमेदवार सर्जेराव खेडकर यांनी अवघ्या १६ मतांनी पराभव केला. सतरा सदस्यांपैकी विरोधकांना १६, तर पाचुंदकरांच्या पॅनलला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले.
ढोक सांगवी ग्रामपंचायतीमध्ये मल्हारी मलगुंडे यांनी
आपल्या नेतृत्वाखालील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. त्यांच्या पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार शोभा शेलार यांनी विरोधी पॅनलच्या प्रियांका जगताप यांचा पराभव केला. तीन जागांसाठी झालेल्या मतदानात तिन्ही जागा मलगुंडेंच्या पॅनलला मिळाल्या.

आमदार पाचर्णे यांचे स्वीय सहायक पराभूत

आंबळे ग्रामपंचायतीत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. सोमनाथ बेंद्रे यांनी त्यांचा पराभव केला. सोमनाथ यांचे ६ सदस्यदेखील निवडून आले. या ग्रामपंचायतीमध्येही सत्ताबदल झाला.
करडे ग्रामपंचायतीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना झटका बसला. त्यांचे सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड पराभूत
झाले. मात्र, ११ पैकी त्यांचे
९ सदस्य निवडून आले. सुनील इसवे हे सरपंचपदी निवडून आले.
जि.प. निवडणुकीत ज्यांनी आमदार पाचर्णे यांच्या मुलाचा पराभव केला, ते राजेंद्र जगदाळे यांनी सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व केले; मात्र त्यांना आपल्या पॅनलचा सरपंच निवडून आणता आला नाही.
चव्हाणवाडी -लंघेवाडी ग्रामपंचायतीत संतोष लंघे सरपंचपदी निवडून आले. त्यांनी संदीप लंघे यांचा पराभव केला. सरपंच लंघे यांचे ७ पैकी ५ सदस्य निवडून आले.

Web Title: In the Shirur taluka, four gram panchayats have change power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.