Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 15:46 IST2023-05-07T15:44:25+5:302023-05-07T15:46:40+5:30
भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM या मराठी सिनेमाला प्राईम टाईम शो, तसेच जास्त शो मिळालेच पाहिजेत

Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली
मलठण : भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित TDM या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला पाहिजे, तसेच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचा आरोप दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केला आहे. त्यामुळे या संदर्भात पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ शिरुर शहरातुन ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या रॅलीची सुरवात करण्यात आली.
TDM चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली (व्हिडिओ - प्रकाश पवार) #pune#TDMpic.twitter.com/8gLrSThmGp
— Lokmat (@lokmat) May 7, 2023
यावेळी TDM ला प्राईम टाईम शो मिळालाच पाहिजे, मराठी चित्रपटाला थियटर मध्ये जास्त शो मिळालेच पाहिजे. असे फलक घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन या रॅलीची सुरवात झाली. तर तहसीलदार कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. शिरुर तालुक्यातील विविध गावातून अनेक शेतकरी स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन भाऊराव कऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM या मराठी सिनेमाला प्राईम टाईम शो, तसेच जास्त शो मिळावेत अशा आशयाचं निवेदनही देण्यात आले.