शिरुरची भक्ती जिल्ह्यात पहिली
By admin | Published: July 18, 2015 04:18 AM2015-07-18T04:18:49+5:302015-07-18T04:18:49+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. चौथीच्या परीक्षेत रहिमतपूर येथील उत्कर्षा निकमने
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. चौथीच्या परीक्षेत रहिमतपूर येथील उत्कर्षा निकमने तर सातवीच्या परीक्षेत नागपूरच्या इंद्रायणी तायडे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील भक्ती कुरंदाळे हिने सातवीत तर ऋतिका यादव हिने चौथीत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
परीक्षा परिषदेतर्फे महिन्याभरापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पूर्ता निकाल जाहीर करण्यात आला होता.त्यावर विद्यार्थी व पालकांच्या हरकती मागवून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. चौथीचा निकाल ५८.४६ टक्के तर सातवी निकाल ४२.९७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना ६६६.े२ूीस्र४ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात चौथीच्या परीक्षेत रुतीका यादव, श्रावणी व्यवहारे, प्रतिक खैरे, साहिल पडवळे, सार्थकी वेदपाठक, समृध्दी थोरात, सानिका मारणे, सज्जाद पठाण, श्रेयस कोंढवळे, स्मित बांगर यांनी अव्वल क्रमांक पटकावला. तर सातवीच्या परीक्षेमध्ये भक्ती कुरंदाळे, सिद्दी गायकवाड, अशितोष धुमाळ, सोनल काथेर, शुभम टाकळकर, सागर शिंदे, सिध्दांत धुमाळ, रुचा भुजबळ,मृणाल पोखरकर,स्वाती पवार यांनी पुणे विभागात पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटवला आहे. (प्रतिनिधी)