शिरूरची रामलिंग यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:26+5:302021-03-05T04:12:26+5:30
याबाबतचे पत्र श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिरूर तहसीलदार लैला शेख व पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना देण्यात ...
याबाबतचे पत्र श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने शिरूर तहसीलदार लैला शेख व पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना देण्यात आले आहे.
शिरूर तालुका, पुणे जिल्हा व राज्यातून अनेक भागातून शिरूर ग्रामीण येथील श्री रामलिंग देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेस दर्शनासाठी येत असतात.
परंतु यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व शिरूर ग्रामीण रामलिंग, शिरूर शहर पंचक्रोशी या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
पुन्हा नव्याने कोरोनाचा दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने बैठक घेऊन यंदाची श्री रामलिंग यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
श्री रामलिंग यात्रा महाशिवरात्रीच्या दिवशी ११ मार्च रोजी आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होईल. यामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री रामलिंग ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल, सचिव तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे, सदस्य गोदाजीराव घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मीकराव कुरुंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, सल्लागार जगन्नाथ पाचर्णे, कारभारी झंझाड, बबनराव कर्डिले या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.