शिक्रापूर येथे मुस्लीम युवकांनी केली शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:29+5:302021-02-21T04:17:29+5:30
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आठ वर्षांपूर्वी गावातील मुस्लीम समाजाने एकत्र येत गावच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे. ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आठ वर्षांपूर्वी गावातील मुस्लीम समाजाने एकत्र येत गावच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे.
आज सर्वत्र शिवजयंती साजरी होत असताना गावातील सर्व मुस्लीम बांधवानी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेत शेरखान शेख, हारून इनामदार, सलीम तांबोळी, बंटी तांबोळी, आमीर शेख, साहिल तांबोळी, अमीर तांबोळी, सिकंदर शेख, जमीर तांबोळी, उबेद मुलानी, नौशाद तांबोळी, आतिक तांबोळी यांसह आदी युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पूजन करून शिवजयंती साजरी केली.
शिक्रापूर येथील सर्व मुस्लीम बांधव गावातील सर्व सण, उत्सवांमध्ये नेहमीच सहभागी होत असतात, तर सध्या मुस्लीम बांधवानी साजरी केलेली शिवजयंती ही समाजाला आगळावेगळा संदेश असून आदर्श असा उपक्रम असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रमेश गडदे, सुभाष खैरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम गायकवाड यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक - २० शिक्रापूर मुस्लीम युवक शिवजयंती.
फोटो ओळी : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिवजयंती साजरी करताना मुस्लीम बांधव. (धनंजय गावडे)