पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:01 AM2019-02-19T11:01:50+5:302019-02-19T11:31:08+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, माजी आमदार भीमराव तापकीर, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, बिव्हिजि ग्रुपचे हणमंत गायकवाड, रोहित पवार, उद्योजक विठ्ठल मानियसार, अभिनेते प्रवीण तरडे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील यांच्या हस्ते यावेळी दामरावजी गायकवाड यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.
#शिवजयंती#ShivajiJayanti शिवाजी महाराजांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? https://t.co/OOlHGVu6hl
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
मिरवणुकीचे हे सातवे वर्ष असून यावर्ष त्यात स्वराज सेनापतीचे 75 रथ त्यात सहभागी झाले आहेत. मिरवणूकीची सुरुवात कोल्हापूर येथील भवानी मंडप प्रवेशद्वारची प्रतिकृती असलेल्या रथाने झाली. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशातील अनेक चिमुकले मिरवणुकीत होते. शहरातील विविध लेझीम आणि ढोल ताशा पथकांनी वादन केले. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला होता.
मिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक यांचे रथ सहभागी झाले आहे.
#ShivJayanti छत्रपती शिवाजी महाराज 'या' गोष्टींमुळे ठरतात जगातले सर्वश्रेष्ठ राजे! https://t.co/3irb0B6DKT
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019
शिवछत्रपतींच्या धाकामुळेच वसली आजची मुंबई... जाणून घ्या कशी?https://t.co/vcgamorQhm#ShivajiMaharaj#shivjayantipic.twitter.com/6S6nC1kCmc
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 19, 2019