निराधार महिलेच्या मदतीसाठी शिवसैनिक धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:41+5:302021-06-06T04:08:41+5:30
त्याचे घडले असे - पारगाव तालुका दौंड येथील शोभा अनंत या ज्येष्ठ निराधार महिलेने शिवसेना उपनेत्या महाराष्ट्र विधान ...
त्याचे घडले असे - पारगाव तालुका दौंड येथील शोभा अनंत या ज्येष्ठ निराधार महिलेने शिवसेना उपनेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांना फोन केला आणि त्यांच्या प्रापंचिक अडचणी सांगितल्या. कोणतीच मदत न पोचल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले व मदतीची अपेक्षा व्यक्त केली. गोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता शिवसेना दौंड विधानसभा नेते माजी नगरसेवक अनिल सोनवणे याना फोन केला व मदतीसंबंधी सूचना केल्या. त्यानंतर अनिल सोनवणे स्वतः ३ ते ४ महिने पुरेल एव्हढे किराणा माल येऊन संबंधित महिलेच्या घरी हजर झाले.
यामध्ये गहू, तांदूळ, साखर, गूळ, पोहे, तेल, शेंगदाणे, रवा, सर्वप्रकारच्या डाळी, जिरे, मोहरी, तिखट, मीठ, साबण खोबरेतेल यांचा समावेश होता. सामान घेऊन महिलेच्या घरी जाऊन सुपूर्द केले. यावेळी शिवसेना दौंड विधान सभा संघटक संतोष जगताप, उपतालुकाप्रमुख सदा लकडे, रमेश निवांगुणे,सर्जेराव म्हस्के,विभागप्रमुख भाऊसो बोत्रे,शहर संघटक नामदेव राहिंज, हरीश खोमणे,देवेंद्र कानपिळे आदी उपस्थित होते.