‘शिवसंग्राम’कडून परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:41+5:302021-03-13T04:18:41+5:30

दुसरीकडे १५ ते २५ मार्च यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ‘मराठा आरक्षणाची’ अंतिम सुनावणी सलगपणे होणार आहे. २५ मार्चनंतर व कोरोनाचे ...

Shiv Sangram welcomes the decision to postpone the exam | ‘शिवसंग्राम’कडून परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत

‘शिवसंग्राम’कडून परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत

Next

दुसरीकडे १५ ते २५ मार्च यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ‘मराठा आरक्षणाची’ अंतिम सुनावणी सलगपणे होणार आहे. २५ मार्चनंतर व कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर या परीक्षा घेतल्या तर त्याचा फायदा ‘मराठा’ विद्यार्थ्यांना निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे ‘शिवसंग्राम’ व विनायक मेटे यांनी स्वागत केले. अनेक वर्षे अन्याय सहन करावा लागत असताना मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो. पुण्यात काही राजकीय नेत्यांनी व विद्यार्थी प्रश्नांचे राजकारण करणाऱ्या मंडळींनी विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचा प्रकार केला व रस्त्यावर गर्दी जमविण्याचे काम केले. याचा तीव्र निषेध करतो. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जो रास्ता रोको केला तिथे कोणत्याही प्रकारच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करताना दिसले नाहीत. मास्क, सोशल डिस्टनसिंग हे तर कोठेही दिसत नव्हते. तरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.

- तुषार काकडे, प्रवक्ता, शिवसंग्राम

Web Title: Shiv Sangram welcomes the decision to postpone the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.