गुंजवणी पाणीवाटपाबाबत शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:39+5:302021-03-28T04:09:39+5:30
गुंजवणी पाणीवाटप बाबत वेल्हे शिवसेना आक्रमक. तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्व जमीन ओलिताखाली आल्याशिवाय इतरांना पाणी नाही, मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांना ...
गुंजवणी पाणीवाटप बाबत वेल्हे शिवसेना आक्रमक.
तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्व जमीन ओलिताखाली आल्याशिवाय इतरांना पाणी नाही,
मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम पाणी दिले गेले पाहिजे, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली आल्याशिवाय इतरांना पाणी दिले जाणार नाही, असे प्रतिपादन वेल्हे तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे यांनी केले.
मालवली येथील सभागृहात तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, संपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, संगीता पोळ, संतोष मोहोळ, सचिन दगडे, तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, सुनील शेंडकर, दीपक गांगुर्डे, गणेश उफाळे, जयश्री शेंडकर, दिनकर चोरगे, बाळासाहेब देशपांडे, राजेश दामगुडे, तानाजी भीरामणे. कल्पना ओंबळे, कैलास चोरघे, गोपाळ दसवडकर, आदी उपस्थित होते.
शैलेंद्र वालगुडे म्हणाले की, गुंजवणी धरणाचे पाणी अगोदर वेल्हे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली आल्या पाहिजेत यासाठी वेल्हे शिवसेना प्रयत्न करणार असून, कोणत्याही परिस्थितीत इतर तालुक्याला पाणी दिले जाणार नाही असा निर्णय बैठीत घेण्यात आला. प्रसंगी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला. दरम्यान, कोणीही विकासकामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. असेही त्यांनी सांगितले.
या वेळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आधी ५० लोकांचा या वेळी शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला.
२७ मार्गासनी
मालवली येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करताना शिवसेनेचे पदाधिकारी..