सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास शिवसेना कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:25+5:302021-07-19T04:08:25+5:30
तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसेना संपर्क दौऱ्यादरम्यान कटके बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, अनिल ...
तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसेना संपर्क दौऱ्यादरम्यान कटके बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, अनिल काशीद, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, उपतालुकाप्रमुख रोहिदास शिवले, चंद्रकांत भुजबळ, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, उपतालुकाप्रमुख नंदा भुजबळ, अलका ढमढेरे, वंदना ढमढेरे, निर्मला ढमढेरे, रेश्मा पठाण उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे येथील बाजार समिती आवारातील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली, यावेळी बोलताना शिरूर तालुक्यात विकास कामांबाबत काही समस्या तसेच नागरिकांसह काही कार्यकर्त्यांच्या अडचणी असतील तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या सोडविल्या जाणार असून नागरिकांचे प्रश्न वरिष्ठांकडे पोहचविले जाणार आहे. मात्र सर्व स्थरातील कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून काम करावे असे देखील शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
१८ तळेगाव ढमढेरे
शिवसेना संपर्क अभियानास महात्मा फुलेंच्या पुतळ्यास हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.