शिवसेनेचीही पुण्यावर नजर, आदित्य ठाकरे होणार सक्रिय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:59 PM2018-04-27T18:59:52+5:302018-04-27T19:06:17+5:30

२०१९साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या रविवारी आदित्य ठाकरे पुण्यात येत असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

Shiv Sena concentrates toward Pune, Aditya Thackeray will active soon | शिवसेनेचीही पुण्यावर नजर, आदित्य ठाकरे होणार सक्रिय 

शिवसेनेचीही पुण्यावर नजर, आदित्य ठाकरे होणार सक्रिय 

Next
ठळक मुद्देरविवारी पुण्यात आदित्य ठाकरे करणार युवासेनेला मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे पाठोपाठ शिवसेनेचेही 'मिशन पुणे' 

पुणे :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठोपाठ शिवसेनेचीही पुण्यावर नजर असून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे पुण्यात रविवारी हजेरी लावणार आहेत. त्याच दिवशी शहरातील काही विधानसभा मतदार संघासाठी पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकांसाठी मुलाखती घेण्यात येणार असून त्यानंतर ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

पुण्यात सध्या शत-प्रतिशत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पुणे महापालिका, आठही विधासभा मतदार संघ, पुणे लोकसभेची जागाही भाजपकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आगामी २०१९मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पुण्यात गेलेले वैभव परत आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागली आहे. दुसरीकडे मनसेच्या राज ठाकरे यांच्याही शहरात चकरा वाढल्या असून त्यांनीही मतदारसंघात टेहळणी सुरु केली आहे. त्यातच आता शिवसेनेनेही रस घेतला असून स्वतः आदित्य ठाकरे त्यात सक्रिय होताना दिसत आहे. 

 

    सध्या शिवसेनेची शहरात फारशी चांगली स्थिती नसून महापालिकेत जेमतेम १० नगरसेवक निवडून आले आहेत तर विधानसभेत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे शहर पक्ष संघटनेत आलेली मरगळ झटकण्यासाठी ठाकरेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. संघटना मजबूत करायची असेल तर सोशल मीडियाचा वापर करणारी आणि धावपळीसाठी सदैव तयार असणाऱ्या युवासेनेला मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याच दृष्टीने रविवारी येरवड्यातील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिरात युवासेना पदाधिकारी पदासाठीच्या मुलाखती पार पडणार आहेत. त्यात वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती  या चार विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.या मुलाखतींच्यानंतर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शहरातील पुणे विधानसभा क्षेत्रप्रमुख उदय सामंत यांच्यासह सर्व माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

 

 

 

 

 

 

Web Title: Shiv Sena concentrates toward Pune, Aditya Thackeray will active soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.