माधव भांडारींच्याविरोधात शिवसेनेने थोपटले दंड

By admin | Published: June 25, 2016 12:44 AM2016-06-25T00:44:14+5:302016-06-25T00:44:14+5:30

शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंडईमध्ये टिळक पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केला

Shiv Sena has imposed a penalty on Madhav Bhandari | माधव भांडारींच्याविरोधात शिवसेनेने थोपटले दंड

माधव भांडारींच्याविरोधात शिवसेनेने थोपटले दंड

Next

पुणे : शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंडईमध्ये टिळक पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचा भडिमार केला. माधव भांडारीचा हायहाय करीत निषेध करण्यात आला, तर शहा यांना कल्लूमामाची उपमा देण्यात आली. भांडारी यांनी तोंड बंद करावे; अन्यथा शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखवून देतील, असा इशारा देण्यात आला.
भाजपाच्या ‘मनोगत’ या मासिकात भांडारी यांनी लेख लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोलेमधील अभिनेते असरानी यांच्याशी केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. त्यात माधव भांडारींच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. शहा यांना कल्लूमामा म्हणून हिणवण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या.
पक्षाचे पालिकेतील गटनेते अशोक हरणावळ, शहर संघटक शाम देशपांडे, गजानन पंडित, नगरसेवक संजय भोसले, संजय मोरे, संदीप मोरे, नगरसेवक सनी निम्हण, शहर समन्वयक शिरीष आपटे, माजी शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, नगरसेविका संगीता ठोसर, विभागप्रमुख दीपक कुंजीर, हनुमंत दगडे, कुणाल शेलार, दत्ता घोडके, संतोष भुतकर, जगदीश भणगे, उमेश भेलके, ऋषीकेश कुंबरे, अनिकेत कपोते, सूरज काटे, उमेश वाघ, अतुल दिघे, राजेश पळसकर, निर्मला केंढे, राधिका हरिश्चंद्रे, सुदर्शना त्रिगुणाईत, कस्तुरी पाटील, छाया भोसले, भावना थोरात, रूपा शिंदे, अमृत पठारे, सविता बलकवडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक
या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

४या वेळी निम्हण म्हणाले, ‘‘भांडारी यांची शिवसेनेसंदर्भात बोलण्याची लायकी नाही. त्यांच्याच पक्षात त्यांना कोणी विचारीत नाही. त्यांनी आपले तोंड बंद ठेवावे; अन्यथा शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखवून देतील. भाजपाला सत्तेची सूज आली आहे. ती उतरण्यास वेळ लागणार नाही. शिवसेनेच्या नादी लागाल तर रस्त्यावर फिरणे अवघड होईल.’’
४भांडारी यांच्या विडंबनात्मक प्रतिमेला महिला शिवसैनिकांनी चपलांचा हार घातला. कल्लूमामा म्हणून शहा यांची प्रतिमा झळकावण्यात येत होती. या दोघांच्या प्रतिमांचे या वेळी दहन करण्यात आले. ‘भांडारी हाय हाय’ याबरोबरच शहा यांच्या विरोधातही शिवसैनिक मोठ्याने घोषणा देत होते.

Web Title: Shiv Sena has imposed a penalty on Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.