भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 05:27 PM2019-09-11T17:27:06+5:302019-09-11T17:32:32+5:30

विधानसभा लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शिवधनुष्य हाती घ्यावे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आव्हान..

Shiv Sena hinders the political ambition of BJP's Harshavardhan Patil | भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर

भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर

Next
ठळक मुद्दे इंदापुरच्या जागेचा तोडगा काढताना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची होणार दमछाक

- प्रशांत ननवरे- 
बारामती: इंदापुर विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते माजी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि .११ ) भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापुरची जागा काँग्रेसला मिळणार नसल्याने राजकीय धुर्तपणा दाखवत भाजपची वाट धरली. मात्र, पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेना मोठा अडसर ठरणार असल्याचे संकेत आहेत. शिवसेना पदाधिकाºयांनी इंदापुर हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ आहे.पाटील यांना निवडणुक लढविण्याची इच्छा असल्यास त्यांनी शिवधनुष्य हाती घेण्याचे आव्हान दिले आहे.तसेच शिवसेनेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये  इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय महत्वकांक्षेतुन पाटील यांनी निवडलेली भाजपची वाट निसरडी होण्याची शक्यता आहे.


 इंदापुरच्या जागेवरुन सेना—भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची संकेत आहेत. शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले,इंदापुर मतदार संघ हा परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ आहे .या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज आपल्या संपर्कात असल्याचा दावा अ‍ॅड. काळे यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांना येथून निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी शिवधनुष्य उचलून शिवेसेनेत प्रवेश करावा. इंदापुरची शिवसेनेची जागा पारंपारिक आहे. ती यंदा देखील राखण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना घेऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे काळे यांनी सांगितले. काळे यांच्या आव्हानामुळे  पाटील यांच्या उमेदवारीवरुन भाजप सेनेच्या पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकण्याचे संकेत आहेत.
   महायुतीची जागावाटपाची चर्चा राज्य पातळीवर यशस्वी झाल्यास इंदापुरच्या जागेचा तोडगा काढताना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. दरम्यान,भाजप सेना युतीचे विधान सभेच्या जागेचा अद्याप ना सुटल्याने काल मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.२०१९ मध्ये इंदापूर तालुक्यात सातजण इच्छुक आहेत.यामध्ये उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, बिपीन कदम, विजय शिरसाट, पिंटू गुप्ते आदी इच्छुक आहेत. यामध्ये बाळासाहेब शिंदे व नितीन कदम यांनी मंगळवारी(दि १०) मुंबई मध्ये मुलाखत दिली. बाकी सर्वजण वेळेत पोहोचूनशकल्याने उर्वरित इच्छुकांच्या नंतर मुलाखती घेण्यात येतील असे सांगण्यात आले. इंदापूर हा मतदारसंघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे २०१४ ला शिवसेना व भाजप  विभक्त लढल्याने दोन्ही पक्ष्याचे उमेदवार उभे होते. यामुळे इंद्पुर तालुका शिवसेनेच्या वतीने इंदापूरची जागा शिवसेनेकडे ठेवावी, अशी मागणी पक्ष प्रमुखाकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया उपजिल्हा प्रमुख संजय काळे यांनी  लोकमत  शी बोलताना दिली.
 
इंदापूर विधानसभा मतदार संघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे . २०१४ चा अपवाद वगळता इंदापूरची जागा शिवसेनेने लढवलेली आहे. १९९५ व १९९९ ला हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. २००४ मध्ये शिवसेनेकडून पारादीप गारटकर यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ७० ते ७२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती.२००९ मध्ये शिवसेनेकडून भीमराव भोसले यांनी निवडणूक लढविली होती, २०१४ मध्ये विशाल बोन्द्रे यांनी निवडणूक लढविली होती. २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यात सातजण इच्छुक आहेत यामध्ये उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, बिपीन कदम, विजय शिरसाट, पिंटू गुप्ते आदी इच्छुक आहेत, यामध्ये बाळासाहेब शिंदे व नितीन कदम यांनी काल मुंबई मध्ये मुलाखत दिली बाकी सर्वजण वेळेत पोहचू न शकल्याने उर्वरित इच्छुकांच्या नंतर मुलाखती घेण्यात येतील असे सांगण्यात आले. इंदापूर हा मतदारसंघ १९९५ पासून शिवसेनेकडे आहे २०१४ ला शिवसेना व भाजप विभक्त लढल्याने दोन्ही पक्ष्याचे उमेदवार उभे होते .दत्तात्रय भरणे यांना (८४, ७६९) मतदान मिळाले.  या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे भीमराव भोसले यांना ४००० मते मिळाली होती.मात्र, २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये चुरशीची लढत होऊन, राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी ( १ लाख, ८ हजार४००) मते मिळवित  तब्बल १५ हजार मताधिक्याने हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत पाटील यांना (९४ हजार २२७) मतदान मिळाले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विशाल बोंद्रे  यांना २१७८  मते मिळालीहोती.२०१९ साठी देखील इंदापुरची जागा लढविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
——————

Web Title: Shiv Sena hinders the political ambition of BJP's Harshavardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.